No edit permissions for मराठी

TEXT 15

sarvasya cāhaṁ hṛdi sanniviṣṭo
mattaḥ smṛtir jñānam apohanaṁ ca
vedaiś ca sarvair aham eva vedyo
vedānta-kṛd veda-vid eva cāham

सर्वस्य-सर्व प्राणिमात्रांचा; -आणि; अहम्-मी; हृदि-हृदयामध्ये; सत्रिविष्टः-स्थित; मत्तः-माङ्यापासून; स्मृतिः-स्मृती; ज्ञानम्-ज्ञान; अपोहनम्-विस्मृती; -आणि; वेदैः-वेदांद्वारे; -सुद्धा; सर्वे:-सर्व; अहम्-मी आहे; एव-निश्चितपणे; वेद्यः-जाणण्यायोग्य; वेदान्त-कृत्-वेदान्ताचे संकलक; वेद-वित्-वेद जाणणारा; एव-निश्चितपणे; -आणि; अहम्-मी.

मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात. सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निस्संदेहमी वेदान्ताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे.

तात्पर्य: भगवंत प्रत्येकाच्या हृदयात परमात्मारूपाने स्थित आहेत आणि सर्व क्रियांचे प्रेरक तेच आहेत. जीव आपल्या पूर्वजन्मातील सर्व काही विसरतो; परंतु त्याच्या सर्व कर्माचे साक्षी असणा-या भगवंतांच्या आदेशानुसारच त्याला कर्म करावे लागते. म्हणून तो पूर्वकर्मानुसार पुन्हा आपल्या कर्माचा प्रारंभ करतो. आवश्यक ते ज्ञान त्याला पुरविले जाते, स्मृती प्रदान केली जाते आणि तो पूर्वजन्माबद्दल सर्व काही विसरतोही. अशा रीतीने भगवंत केवळ सर्वव्यापीच आहेत असे नव्हे तर अंतर्यामी परमात्माही आहेत. तेच सकाम कर्माचे फळही प्रदान करतात. निर्विशेष ब्रह्म, भगवंत आणि परमात्मा म्हणूनच केवळ ते पूजनीय आहेत असे नव्हे तर ते वेदावतार या रूपानेही आराध्य आहेत. वेद हे लोकांना आपल्या जीवनाला असे वळण देण्यास अचूक मार्गदर्शन करतात, जेणेकरून ते स्वगृही भगवद्धामात परत जाऊ शकतील. वेद हे भगवान श्रीकृष्णांबद्दल ज्ञान प्रदान करतात आणि श्रीकृष्ण, व्यासदेव या आपल्या अवताराद्वारे वेदांचे संकलन करतात. व्यासदेवकृत श्रीमद्भागवत हे वेदान्त सूत्राचे भाष्य आहे आणि ते वास्तविक ज्ञान प्रदान करते. भगवंत हे इतके परिपूर्ण आहेत की, जीवाचा उद्धार करण्याकरिता ते अन्नाचा पुरवठा आणि पचनही करतात. तेच सर्व कर्माचे साक्षी असून वेदांच्या रूपाने ज्ञान देतात आणि भगवान श्रीकृष्ण स्वत: भगवद्गीतेची शिकवण देतात. बद्ध जीवांद्वारे ते आराध्य आहेत.

          अन्तः प्रविष्टः शास्त जनानाम् /जीव जेव्हा वर्तमान देहाचा त्याग करतो तेव्हा त्याला सर्व गोष्टींचे विस्मरण होते; परंतु भगवंताच्या प्रेरणेमुळे तो पुन्हा आपली कमें सुरू करतो. त्याला जरी पूर्वकर्मांचे विस्मरण झाले तरी खंडित पूर्वकर्मांना पुन्हा प्रवृत्त करण्यासाठी भगवंत त्याला बुद्धी देतात. म्हणून अंतर्यामी भगवंतांच्या आदेशांनुसार या जगतात जीव केवळ सुखदुःख भोगतो एवढेच नव्हे तर वेदांचे ज्ञान प्राप्त करण्याची सुसंधीही त्यांच्याकडूनच प्राप्त होते. जर वैदिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणी प्रामाणिक असेल तर श्रीकृष्ण त्याला आवश्यक ती बुद्धी प्रदान करतात. भगवंतांनी अशा प्रकारे जाणण्यासाठी वेदांचे ज्ञान का बरे प्रकट केले? कारण जीवाने व्यक्तिशः श्रीकृष्णांना जाणणे आवश्यक आहे. वेद या गोष्टीला दुजोरा देतात. योऽसी सर्वेवॅर्देगींयते. चतुर्वेद, वेदान्त सूत्र, उपनिषद आणि पुराणांसहित संपूर्ण वेद वाङ्मयात तत्वज्ञानाची चर्चा करून आणि भक्तीद्वारे भगवंतांची आराधना करून भगवत्प्राप्ती होते. म्हणून श्रीकृष्णांना जाणणे हाच वेदांचा उद्देश आहे. श्रीकृष्णांचा साक्षात्कार करण्यासाठी आणि त्यांना जाणण्यासाठी वेद आपल्याला मार्गदर्शन करतात. वेदांचे अंतिम ध्येय भगवंतच आहेत. वेदान्त सूत्र (१.१.४) पुढील शब्दांत या गोष्टीचे अनुमोदन करतात ततु समन्वयातू मनुष्य तीन अवस्थांमध्ये पूर्णत्व प्राप्त करू शकतो. वेदांना जाणल्याने त्याला भगवंतांशी असणा-या आपल्या संबंधाचे ज्ञान होऊ शकते, विविध मार्गाचा अवलंब करून त्यांना तो शरण जाऊ शकतो आणि अखेरीस परमलक्ष्याची, भगवंतांची प्राप्ती करू शकतो. या श्लोकामध्ये वेदांचे प्रयोजन, वेदांचे ज्ञान आणि वेदांचे लक्ष्य याचे स्पष्ट निरूपण करण्यात आले आहे.

« Previous Next »