No edit permissions for मराठी

TEXT 21

tri-vidhaṁ narakasyedaṁ
dvāraṁ nāśanam ātmanaḥ
kāmaḥ krodhas tathā lobhas
tasmād etat trayaṁ tyajet

त्रि-विधम्—तीन प्रकारचे; नरकस्य—नरकाचे;इदम्—हे;द्वारम्—द्वार;नाशनम्—विनाशकारक; आत्मनः-आत्म्याचे; कामः-काम; क्रोधः-क्रोध; तथा-तसेच; लोभः-लोभ; तस्मात- म्हणून; एतत्-हे; त्रयम्-तीन; त्यजेत्-मनुष्याने त्याग केला पाहिजे.

काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची तीन द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हींमुळे आत्म्याचा विनाश होतो.

तात्पर्य: आसुरी जीवनाचा आरंभ कसा होतो हे या ठिकाणी वर्णिले आहे. मनुष्य कामवासना तृप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा कामाची तृप्ती होत नाही तेव्हा क्रोध आणि लोभ उत्पन्न होतो. ज्या बुद्धिमान मनुष्याला आसुरी योनी प्राप्त करावयाची नाही त्याने या शत्रूचा त्याग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण हे शत्रू आत्म्याचा इतक्या थरापर्यंत नाश करू शकतात की, त्याला पुन्हा भवबंधनातून मुक्त होण्याचा संभवच नसतो.

« Previous Next »