No edit permissions for मराठी

TEXT 23

oṁ tat sad iti nirdeśo
brahmaṇas tri-vidhaḥ smṛtaḥ
brāhmaṇās tena vedāś ca
yajñāś ca vihitāḥ purā

-परमेश्वराचा निर्देश करणारा नाद, ॐ; तत्-ते, सत्-सनातन, इति-याप्रमाणे, निर्देश:- निर्देश; ब्रह्मणः-परब्रह्माचा; त्रि-विधः-तीन प्रकारचे; स्मृतः-मानले जाते; ब्राह्मणाः-ब्राह्मण; तेन-त्याद्वारे; वेदाः-वेदः -सुद्धा: यज्ञाः-यज्ञः -सुद्धा; विहिताः-योजिलेल्याः पुरा-पूर्वी.

सृष्टीच्या आरंभापासूनच'ॐतत् सत्' हे तीन शब्द परम सत्याचा निर्देश करण्यासाठी योजिले जातात. वेदोक्त मंत्रांचे उच्चारण करताना आणि परब्रह्माच्या संतुष्टीप्रीत्यर्थ यज्ञ करताना, ब्राह्मण या निर्देशाचा उपयोग करीत असत.

तात्पर्य: तप, यज्ञ, दान आणि आहार यांचे सात्विक, राजसिक आणि तामसिक असे तीन प्रकारे वर्गीकरण करण्यात येते व याचे वर्णन पूर्वी करण्यात आले आहे. परंतु ते प्रथम, द्वितीय किंवा तृतीय कोणत्याही श्रेणीचे असले तरी ते प्राकृतिक गुणांनी कलुषित असल्यामुळे बद्धच असतात. परंतु जेव्हा तप, दान, यज्ञ आणि आहार यांचा उपयोग' ॐतत् सत्' अर्थात पुरुषोत्तम श्रीभगवान यांच्याप्रीत्यर्थ केला जातो तेव्हा ती आध्यात्मिक उन्नतीची साधने बनतात. शास्त्रांमध्ये याच ध्येयाचा उल्लेख करण्यात आला आहे. अंतत् सत् हे तीन शब्द विशेष करून परम सत्य, पुरुषोत्तम श्रीभगवान यांचा निर्देश करतात. वैदिक मंत्रामध्ये ॐकार नेहमी आढळतो.

          शास्त्रांतील विधिविधानांचे जो पालन करीत नाही तो परम सत्याची प्राप्ती करू शकत नाही. अशा व्यक्तीला जीवनाच्या अंतिम उद्देशाची प्राप्ती न होता तात्पुरते फळ मिळते. निष्कर्ष असा की दान, यज्ञ आणि तप इत्यादींचे आचरण सात्विक असले पाहिजे. याचे आचरण रजोगुणी किंवा तमोगुणी असेल तर ते निश्चितच निकृष्ट असते. ॐतत् सत् या तीन शब्दांचा उच्चार भगवंतांच्या पवित्र नामाबरोबर केला जातो. उदाहरणार्थ, अंतद् विष्णो: वैदिक मंत्रांच्या आणि भगवंतांच्या पवित्र नामापूर्वी ॐकार उच्चारला जातो. हा वेदांचा निर्देशक आहे. उपरोक्त तीन शब्द वैदिक मंत्रातून घेतले आहेत. ॐ इत्येतद्ब्रह्मणी नेदिष्ठं नाम (ऋग्वेद) हे प्रथम लक्ष्याचे सूचक आहे. त्वमसि  (छान्दोग्य उपनिषद ६.८७) हे दुस-या लक्ष्याचे सूचक आहे. सद् एव सौम्य (छान्दोग्य उपनिषद ६.२१) हे तिस-या लक्ष्याचे सूचक आहे. या सर्वांच्या समूहाने 'ॐतत् सत्' असे बनते. पूर्वी सृष्टीतील आदिजीव ब्रह्मदेव यांनी यज्ञ केला तेव्हा त्यांनी भगवंतांना या तीन शब्दांद्वारे संबोधिले. म्हणून गुरुशिष्य परंपरेद्वारे याच तत्वाचे पालन करण्यात येते. यास्तव हा मंत्र अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवद्गीता सांगते की, कोणतेही कर्म ॐतत् सत् म्हणून भगवंतांप्रीत्यर्थ केले पाहिजे. मनुष्य जेव्हा या तीन शब्दांच्या उच्चारणासहित तप, दान आणि यज्ञ करतो तेव्हा त्याचे कर्म कृष्णभावनाभावित होते. कृष्णभावना म्हणजे दिव्य कर्म करण्याचा वैज्ञानिक विधी आहे, ज्यामुळे मनुष्य स्वगृही, भगवद्धामात परत जाऊ शकतो. असे कर्म करण्याने कोणतीही हानी होत नाही.

« Previous Next »