No edit permissions for मराठी

TEXT 12

aniṣṭam iṣṭaṁ miśraṁ ca
tri-vidhaṁ karmaṇaḥ phalam
bhavaty atyāgināṁ pretya
na tu sannyāsināṁ kvacit

अनिष्टम्-नरकात घेऊन जाणारा; इष्टम्-स्वर्गाकडे घेऊन जाणारा; मिश्रम-मिश्र;-आणि; त्रिविधम्-तीन प्रकारचे; कर्मणः-कर्माचे; फलम्-फल; भवति-मिळते; अत्यागिनाम्-त्याग न करणा-याला; प्रेत्य-मृत्यूनंतर; -नाही; तु-परंतु; सन्न्यासिनाम्-संन्याशांकरिता; क्वचि-कधीच.

जो त्यागी नाही त्याला मृत्यूनंतर इष्ट, अनिष्ट व मिश्र असे तीन प्रकारचे कर्मफलप्राप्त होते. परंतु जे संन्यासाश्रमात आहेत त्यांना कर्मफलाचे सुख अथवा दुःख भोगावे लागत नाही.

तात्पर्य: श्रीकृष्णांशी आपला संबंध आहे या ज्ञानाने जो कृष्णभावनाभावित मनुष्य कर्म करतो तो नित्य मुक्त आहे. म्हणून मृत्यूनंतरही त्याला आपल्या कर्माची सुखदुःखरूपी फळे भोगावी लागत नाहीत.

« Previous Next »