No edit permissions for मराठी

TEXT 11

na hi deha-bhṛtā śakyaṁ
tyaktuṁ karmāṇy aśeṣataḥ
yas tu karma-phala-tyāgī
sa tyāgīty abhidhīyate

-कधीही नाही; हि-खचित; देह-भूता-देहधारी जीवाला; शक्यम्-शक्य; त्यातुम्-त्याग करणे; कर्माणि-कर्मे; अशेषतः-पूर्णरूपाने; यः-जो; तु-परंतु:कर्म-कर्माचे:फल-फळ; त्यागी-त्याग करणारा;स:-तो; त्यागी-त्याग करणारा; इति-असे; अभिधीयते-म्हटले जाते.

देहधारी जीवांना सर्व कर्माचा त्याग करणे खरोखर शक्य नाही. परंतु जो कर्मफलाचा त्याग करतो तोच खरा त्यागी होय.

तात्पर्य: भगवद्गीतेत सांगितले आहे की, मनुष्य कधीही कर्म करणे सोडून देऊ शकत नाही. म्हणून जो श्रीकृष्णांकरिता कर्म करतो व कर्मफलांचा भोग करीत नाही, सर्व काही श्रीकृष्णांना अर्पण करतो तोच खरोखर त्यागी होय. आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाचे अनेक सदस्य आहेत जे त्यांच्या कार्यालयात, कारखान्यात किंवा इतरत्र कठोर परिश्रम करतात व त्यांना जे काही प्राप्त होते ते सर्व संघाला दान करतात. असे महात्मा व्यक्ती वास्तविक संन्यासी असून ते संन्यासाश्रमात स्थित आहेत. या ठिकाणी स्पष्टपणे दाखवून दिले आहे की, कर्मफलांचा त्याग कसा केला जातो व कोणत्या कारणांकरिता कर्मफलांचा त्याग केला पाहिजे.

« Previous Next »