No edit permissions for मराठी

TEXT 13

pañcaitāni mahā-bāho
kāraṇāni nibodha me
sāṅkhye kṛtānte proktāni
siddhaye sarva-karmaṇām

पञ्च-पाच; एतानि-ही; महा-बाहो-हे महाबाहू; कारणानि-कारणे; निबोध-समजून घे; मे-माझ्याकडून; साङ्ख्ये-वेदान्तात; कृत-अन्ते-निष्कर्ष रूपात; प्रोक्तानि-म्हटलेले; सिद्धये-सिद्धीकरिता; सर्व-सर्व; कर्मणाम्-कर्माचे.

हे महाबाहू अर्जुन! वेदान्तानुसार सर्व कर्माच्या सिद्धीची पाच कारणे असतात. ती कारणे माझ्याकडून समजून घे.

तात्पर्य: या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो की, जर केलेल्या कोणत्याही कर्माचे काही तरी फल असतेच, तर मग कृष्णभावनामय मनुष्याला त्या कर्माची सुखदुःखरूपी फळे का बरे भोगावी लागत नाहीत? भगवंत, वेदान्तदर्शनावरून हे कसे शक्य होते ते सांगत आहेत. ते म्हणतात की, सर्व कर्मे घडून येण्यामागे पाच कारणे असतात आणि सर्व कर्मामध्ये सिद्धी प्राप्त करण्याकरिता आपण या पाच कारणांचा विचार केला पाहिजे. सांख्य तत्त्वज्ञान म्हणजे ज्ञानाचा आधार आणि वेदान्ताला सर्व प्रमुख आचार्यांनी ज्ञानाचा अंतिम आधार म्हणून स्वीकारले आहे. श्रीपाद शंकराचार्यांनीही वेदान्तसूत्राचा या रीतीने स्वीकार केला आहे. म्हणून अशा शास्त्रांचा सल्ला घेतला पाहिजे.

     अंतिम नियंत्रण परमात्म्याकडे असते. ज्याप्रमाणे भगवद्‌गीतेत सांगितले आहे की, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्ट:-ते प्रत्येक व्यक्तीला त्याच्या पूर्वकर्माचे स्मरण करवून कोणत्या ना कोणत्या तरी कार्यात संलग्न करीत असतात. त्यांच्या निर्देशनानुसार जी कृष्णभावनामय कर्मे केली. जातात, त्यांचे फळ या जीवनात किंवा मृत्यूनंतरच्या जीवनात कधीच भोगावे लागत नाही.

« Previous Next »