TEXT 14
adhiṣṭhānaṁ tathā kartā
karaṇaṁ ca pṛthag-vidham
vividhāś ca pṛthak ceṣṭā
daivaṁ caivātra pañcamam
अधिष्ठानम्-स्थान; तथा-तसेच; कर्ता-करणारा; करणम्-साधने; च-आणि; पृथक्विधम्-निरनिराळया प्रकारचे; विविधाः—विविध; च-आणिः पृथक्-निरनिराळे; चेष्टाः— प्रयत्न: दैवम्-परमात्मा; च-आणि; एव-खचित; अत्र-इथे; पञ्चमम्-पाचवे.
कर्माचे स्थान (शरीर), कर्ता, विभिन्न इंद्रिये, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा -ही पाच कारणे होत.
तात्पर्य: आधिष्ठानम् म्हणजे शरीर. शरीरात निवास करणारा आत्मा कार्य करतो जेणेकरून कर्माचे फळ प्राप्त करता येते व म्हणून त्याला कर्ता असे म्हणतात. आत्मा हा ज्ञाता व कर्ता आहे असे श्रुतीत सांगितले आहे. एष हि द्रष्टा स्रष्टा (प्रश्न उपनिषद ४.९) वेदान्तसूत्रामधील ज्ञोऽत एव (२.३.१८) आणि कर्ता शास्त्रार्थवत्त्वात (२.३.३३) या श्लोकात देखील याची पुष्टी केलेली आहे. इंद्रिये ही कर्माची साधने आहेत आणि आत्मा इंद्रियांच्या मदतीने निरनिराळी कमें करीत असतो. प्रत्येक कर्माकरिता वेगळा प्रयत्न असतो. परंतु आपली सर्व कमें परमात्म्याच्या इच्छेवर अवलंबून असतात, जो प्रत्येकाच्या हृदयात एका मित्राच्या रुपात स्थित असतो. परमात्मा सर्व कारणांचे कारण आहे. अशा परिस्थितीमध्ये जो हृदयस्थ परमात्म्याच्या निर्देशनाखाली कृष्णभावनेत कर्म करीत असतो तो स्वाभाविकपणेच कर्मबंधनात सापडत नाही. जे पूर्ण कृष्णभावनामय आहेत ते अंततः त्यांच्या कर्माकरिता जबाबदार ठरत नाहीत. सर्व काही परम इच्छा, परमात्मा, भगवंतांवर अवलंबून असते.