No edit permissions for मराठी

TEXT 32

adharmaṁ dharmam iti yā
manyate tamasāvṛtā
sarvārthān viparītāṁś ca
buddhiḥ sā pārtha tāmasī

अधर्मम्-अधर्म; धर्मम्-धर्म; इति-असे; या-जी; मन्यते-मानते; तमसा-भ्रमाने; आवृता-आवृत झालेली; सर्व-अर्थान्-सर्व गोष्टींत; विपरीतान्-विपरीत मार्गाने; -सुद्धा; बुद्धिः-बुद्धी; सा-ती; पार्थ-हे पार्थ; तामसी-तामसिक.

भ्रम आणि अंधकाराच्या प्रभावामुळे जी बुद्धी धर्माला अधर्म व अधर्माला धर्म समजते आणि सदैव विपरीत मार्गाने कार्य करते ती बुद्धी म्हणजे तामसिक बुद्धी होय.

तात्पर्य: तामसिक बुद्धी ही सदैव विपरीत रूपाने कार्य करते. जो यथार्थ धर्म नाही त्या धर्माचा ती स्वीकार करते व यथार्थ धर्माचा धिक्कार करते. तमोगुणी मनुष्य, महात्म्याला साधारण मनुष्य तर साधारण मनुष्याला महात्मा समजतात. त्यांना सत्य हे असत्य वाटते आणि ते असत्याचा सत्य म्हणून स्वीकार करतात. सर्व गोष्टींत ते केवळ विपरीत मार्गाचेच अनुसरण करतात, म्हणून त्यांची बुद्धी तामसिक बुद्धी होय.

« Previous Next »