TEXT 35
yayā svapnaṁ bhayaṁ śokaṁ
viṣādaṁ madam eva ca
na vimuñcati durmedhā
dhṛtiḥ sā pārtha tāmasī
यया-ज्यामुळे; स्वप्नम्-स्वप्न; भयम्-भय; शोकम्-शोक; विषादम्-विषाद किंवा खिन्नता; मदम्-मोह; एव-निश्चितपणे; च-सुद्धा; न-कधीच नाही; विमुकृति-मनुष्य त्याग करतो; दुर्मेधा-दुर्बुद्धी; धृति:-धृती, निर्धार; सा-ती; पार्थ-हे पार्थ; तामसी-तमोगुणी.
हे पार्थ! जी धृती, स्वप्न, भय, शोक, विषाद आणि मोहाच्या पलीकडे जाऊ शकत नाही ती दुर्बुद्धीपूर्ण धृती म्हणजेच तामसी धृती होय.
तात्पर्य: यावरून असा निष्कर्ष काढू नये की, सत्वगुणी मनुष्याला स्वप्ने पडत नाही. या ठिकाणी 'स्वप्न' म्हणजे अतिनिद्रा होय. सत्व, रज, तम या तिन्ही गुणांत स्वप्नावस्था असतेच, कारण स्वप्न ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु जे अतिनिद्रा व भौतिक वस्तूंचा उपभोग घेण्याचा अहंभाव टाळू शकत नाही आणि जे भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याचे सदैव स्वप्न पाहात असतात आणि याप्रमाणे ज्यांचे प्राण, मन आणि इंद्रिये गुंतलेली असतात त्या मनुष्यांची धृती तामसिक समजली जाते.