No edit permissions for मराठी

TEXT 58

mac-cittaḥ sarva-durgāṇi
mat-prasādāt tariṣyasi
atha cet tvam ahaṅkārān
na śroṣyasi vinaṅkṣyasi

मत्-माझ्या; चित्तः-भावनायुक्त होऊन; सर्व-सर्व; दुर्गाणि-संकटे; मत्-प्रसादात्-माझ्या कृपेने; तरिष्यसि-तरून जाशील; अथ-परंतुः चेत्-जर; त्वम्—तू; अहङ्कारात्-मिथ्या अहंकाराने; श्रोष्यसि-ऐकणार नाहीस; विनङ्क्ष्यसि-नष्ट होशील,

जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकटे पार करशील. तथापि, जर तू अशा भावनेमध्ये कर्म न करता व अहंकाराने माझे न ऐकता कर्म केलेस तर नाश पावशील.

तात्पर्य: कृष्णभावनाभावित मनुष्य हा आपली जीवनावश्यक कर्तव्ये पार पाडीत असताना कर्तव्यांबद्दल व्यर्थ चिंता करीत नाही. या प्रकारची चिंतामुक्तता मूर्ख लोक जाणू शकत नाहीत. जो कृष्णभावनामय होऊन कर्म करतो त्याचे भगवान श्रीकृष्ण जिवलग सखा होतात. श्रीकृष्ण सदैव त्यांच्या मित्राच्या सुखाकडे लक्ष देत असतात आणि असा भक्त, जो भक्तिभावाने भगवंतांना संतुष्ट करण्याकरिता त्यांची अहर्निश सेवा करण्यामध्ये संलग्न असतो त्याच्या, भगवंत पूर्णपणे अधीन होतात. म्हणून मनुष्याने अहंकारयुक्त देहात्मबुद्धीच्या आहारी जाऊ नये. मनुष्याने मूर्खपणाने समजू नये की, आपण प्राकृतिक नियमांच्या अतीत आहोत किंवा आपण कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास स्वतंत्र आहोत. मनुष्य सर्व परिस्थितीत प्रकृतीच्या कठोर नियमांच्या अधीन असतो; परंतु जेव्हा तो कृष्णभावनाभावित कर्म करतो तेव्हा तो सर्व भौतिक जंजाळातून मुक्त होतो. त्याने निश्चितपणे जाणले पाहिजे की, जो कृष्णभावनेमध्ये सक्रिय नाही तो जन्ममृत्युरूपी भवसागराच्या भोव-यात स्वत:चा नाश करीत आहे. कोणत्याही बद्ध जीवाला कार्य-अकार्य यातील भेद कळत नाही. तथापि, जो कृष्णभावनाभावित कर्म करीत आहे तो कर्म करण्यास स्वतंत्र असतो, कारण तो करीत असलेल्या सर्व गोष्टींना अंतरातून श्रीकृष्णांद्वारे प्रेरणा प्राप्त होत असते आणि या क्रिया आध्यात्मिक गुरूद्वारे प्रमाणित असतात.

« Previous Next »