No edit permissions for मराठी

TEXT 68

ya idaṁ paramaṁ guhyaṁ
mad-bhakteṣv abhidhāsyati
bhaktiṁ mayi parāṁ kṛtvā
mām evaiṣyaty asaṁśayaḥ

यः—जो; इदम्—हे; परमम्—परम; गुहाम्—गुह्य, मत्—माझ्या; भक्तेषु—भक्तामध्ये; अभिधास्यति-सांगतो; भक्तिम्—भक्ती, मयि-मला; पराम्—दिव्य; कृत्वा—करून; माम्— मला; एव-खचित; एष्यति—येतो; असंशयः-निःसंशय.

जो मनुष्य, भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल व अखेरीस तो माझ्याकडे परत येईल. यात मुळीच संशय नाही.

तात्पर्य: सामान्यतः सांगितले जाते की, भगवद्गीतेची चर्चा ही केवळ भक्तांमध्ये करावी, कारण जे भक्त नाहीत त्यांना भगवद्गीताही जाणणे शक्य नाही किंवा श्रीकृष्णांनाही जाणणे शक्य नाही. जे श्रीकृष्णंना आणि भगवद्गीतेला तत्वतः स्वीकारीत नाहीत त्यांनी आपल्या लहरीनुसार भगवद्गीतेचे विवेचन करण्याचा प्रयत्न करून अपराधी होऊ नये. जे श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम हा विषय शुष्क ज्ञानींसाठी नसून केवळ भक्तांसाठीच आहे. तथापि, जो कोणी भगवद्गीतेला यथार्थ रूपामध्ये प्रस्तुत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो त्याची भक्तीमध्ये प्रगती होईल आणि तो शुद्ध भक्तिमय जीवनात उन्नत होईल. अशा शुद्ध भक्तीमुळे तो निश्चितपणे स्वगृही, भगवद्धामात परत जातो.

« Previous Next »