No edit permissions for मराठी

TEXT 32

yadṛcchayā copapannaṁ
svarga-dvāram apāvṛtam
sukhinaḥ kṣatriyāḥ pārtha
labhante yuddham īdṛśam

यद्दच्छया- सहजगत्या; -सुद्धा; उपपन्नम् - प्राप्त झालेले; स्वर्ग - स्वर्गाचे; द्वारम्-द्वार; अपावृतम् -पूर्ण उघडलेले; सुखिन:- अत्यंत सुखी; क्षत्रिया:- राजवंशातील लोकांना; पार्थ- हे पार्थ (पृथापुत्र); लभन्ते- निश्चित प्राप्त होते; युद्धम् - युद्ध ; ईद्दशम्- यासारखे

हे पार्थ! ज्या क्षत्रियांना अशा युद्धाची संधी प्रयत्न करताही येते ते खरोखरच सुखी आहेत, कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गांची द्वारे सताड उघडी होतात.

तात्पर्य: अर्जुन जेव्हा म्हणाला की,‘‘मला या युद्धापासून कल्याणकारक असे काहीच दिसत नाही. यामुळे शाश्वत नरकवासच भोगावा लागेल.’’ तेव्हा अर्जुनाच्या या प्रवृत्तीची विश्वाचे आदिगुरु भगवान श्रीकृष्णांनी निंदा केली होती. अर्जुनाने अशी विधाने केवळ अज्ञानामुळेच केली होती. अहिंसक बनून त्याला त्याचे नियत कर्म करावयाचे होते. क्षत्रियाने रंणागणावर असूनही अहिंसक बनावे हे मूर्खांचे तत्वज्ञान आहे. महान ऋषी आणि व्यासदेवांचे पिता, पराशनरमुनी आपल्या ‘पराशर स्मृतीत’ सांगतात की,

क्षत्रियो हि प्रजारक्षन् शस्त्रपाणि: प्रदण्डयन्।
निर्जित्य परसैन्यादि क्षितिं धर्मेण पालयेत् ॥

     ‘‘सर्व प्रकारच्या संकटातून प्रजेचे रक्षण करणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे. यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरिता त्याला योग्य बाबतीत हिंसेचा वापर करावा लागतो. म्हणून त्याला शत्रू राजाच्या सैन्याचा नि:पात करावा लागतो आणि याप्रमाणे धर्मतत्त्वानुसार त्याने जगावर राज्य करावे.’’

     सर्व बाबींचा विचार केल्यास अर्जुनाने युद्धापासून परावृत्त होण्याचे काहीच कारण नव्हते. जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला असता तर त्याला राज्यापभोग घेता आला असता आणि जर युद्धामध्ये तो मारला गेला असता तरी त्याची स्वर्गलोकाप्रती उन्नती झाली असती, कारण तेथील द्वारे त्याच्यासाठी सताड खुली होती. दोन्हीपैकी कोणत्याही परिस्थितीत युद्ध करणे त्याला लाभदायकच होते.

« Previous Next »