No edit permissions for मराठी

TEXT 36

avācya-vādāṁś ca bahūn
vadiṣyanti tavāhitāḥ
nindantas tava sāmarthyaṁ
tato duḥkha-taraṁ nu kim

अवाच्य - वाईट, कटू; वादान् -खोट्या गोष्टी; च- सुद्धा; बहून्- पुष्कळ; वदिष्यन्ति-बोलतील; तव- तुझे; अहिता:- शत्रू; निन्दन्त:- निंदा करीत असताना; तव-तुझी; सामर्थ्यम् - योग्यता; तत:- त्यापेक्षा; दुख: -तरम् - अधिक दु:खकर; नु- अर्थातच, मग; किम्-काय आहे.

तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दांत तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दु:खकर असे तुला काय आहे?

तात्पर्य : प्रारंभी भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाच्या अनाहूत करूणेबद्दल आश्‍चर्य वाटले आणि ही करुणा अनार्यानाच साजेशी आहे, असे ते म्हणतात. आता श्रीकृष्णांनी इतक्या प्रकारे बोलून अर्जुनाच्या तथाकथित ‘करुणेच्या’ विरोधात स्वत:ची मते पटवून दिली आहेत.

« Previous Next »