No edit permissions for मराठी

TEXT 44

bhogaiśvarya-prasaktānāṁ
tayāpahṛta-cetasām
vyavasāyātmikā buddhiḥ
samādhau na vidhīyate

भोग - भौतिक विषयोपभोगांना; ऐश्वर्य - आणि ऐश्वर्य; प्रसक्तानाम् - याप्रमाणे आसक्त असतात त्यांना; तया- अशा गोष्टींनी; अपहृत -चेतसाम् - जे मनात गोंधळलेले असतात; व्यवसाय-आत्मिक- दृढनिश्‍चर्य; बुद्धि:- भगवंतांची भक्तिपूर्ण सेवा; समाधौ-स्थिर झालेल्या अंत:करणात; -कधीही नाही; विधीयते- होते.

जे लोक इंद्रियतृप्ती आणि भौतिक ऐश्वर्यात अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि या गोष्टीमुळे जे मोहग्रस्त झालेले आहेत त्यांच्या मनामध्ये भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेचा दृढनिश्‍चय होऊ शकत नाही.

तात्पर्य : समाधि म्हणजेच स्थिर मन होय. निरूक्ति या वैदिक शब्दकोशनात म्हटले आहे सम्यग् आधीयतेऽस्मिन्नात्मतत्वयाथात्म्यम् - जेव्हा मन आत्मज्ञानामध्ये स्थिर होते तेव्हा ते समाधिस्थ आहे असे म्हटले जाते. भौतिक इंद्रियतृप्तीत स्वारस्य असणाऱ्या तसेच अशा क्षणभंगुर गोष्टींनी मोहग्रस्त झालेल्या लोकांना समाधी कधीच शक्य होत नाही. भौतिक प्रकृतीच्या योजनेमुळे ते कमीअधिक प्रमाणात अपयशीच झालेले असतात.

« Previous Next »