No edit permissions for मराठी

TEXT 71

vihāya kāmān yaḥ sarvān
pumāṁś carati niḥspṛhaḥ
nirmamo nirahaṅkāraḥ
sa śāntim adhigacchati

विहाय-त्याग करून; कामान्- इंद्रियतृप्तीकरिता असणाऱ्या सर्व भौतिक इच्छा; य:- जो; सर्वान् - सर्व; पुमान्- मनुष्य; चरति- राहतो; नि:स्पृह:- इच्छारहित, निरिच्छ; निर्मम:- स्वामित्वाच्या किंवा मालकीच्या भावनेने रहित; निरहङ्कार:- मिथ्या अंकाररहित; स:- तो; शान्तिम्- पुर्ण शांती;  अधिगच्छति- प्राप्त करतो.

ज्या मनुष्याने इंद्रियतृप्तीच्या सर्व इच्छांचा त्याग केला आहे, जो नि:स्पृह अथवा इच्छारहित जीवन जगत आहे, ज्याने पूर्णपणे स्वामित्वाच्या भावनांचा त्याग केला आहे, त्यांच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नाही तोच केवळ वास्तविक शांती प्राप्त करू शकतो.

तात्पर्य : नि:स्पृह किंवा इच्छारहित होणे म्हणजे इंद्रियतृप्तीकरिता काशाचीही इच्छा न करणे होय. दुसऱ्या शब्दांत, कृष्णभवानाभावित होणची इच्छा करणे म्हणजेच वास्तविकपणे नि:स्पृह होणे होय. आपण स्वत: म्हणजे हे भौतिक शरीर आहोत असा खोटा दावा न करता आणि जगातील कोणत्याही गोष्टीवर स्वामित्वाचा हक्क न सांगता, आपले मूळ स्वरुप म्हणजे श्रीकृष्णांचा नित्य सेवक हे आहे याची जाणीव होणे ही कृष्णभावनेची परिपूर्ण स्थिती आहे. जो या परिपूर्ण स्थितीमध्ये स्थिर झाला आहे तो जाणतो की, श्रीकृष्ण हेच सर्व गोष्टींचे स्वामी असल्याकारणाने सर्व गोष्टींचा उपयोग केवळ त्यांच्या संतुष्टीसाठीच केला पाहिजे. युद्ध न करण्यामध्ये अर्जुनाची इंद्रियतृप्तीच होती म्हणून त्याला युद्धच करावयाचे नव्हते; पण जेव्हा तो पूर्णपणे कृष्णभावनाभावित झाला तेव्हा त्याने युद्ध केले, कारण त्याने युद्ध करावे ही श्रीकृष्णांची इच्छा होती. स्वत:साठी त्याला युद्ध करावयाची मुळीच इच्छा नव्हती, पण श्रीकृष्णांसाठी त्याच अर्जुनाने आपल्या संपूर्ण सामर्थ्यानिशी युद्ध केले. वास्तविक नि:स्पृहपणा म्हणजे इच्छ नष्ट करण्याचा कृत्रिम प्रयत्न नसून श्रीकृष्णांची संतुष्टी करणे हाच होय. जीव हा इच्छारहित किंवा भावनाशून्य असूच शकत नाही. त्याने आपल्या इच्छांची गुणात्मकता बदलणे अत्यावश्यक आहे. भौतिकदृष्ट्या इच्छारहित असलेला मनुष्य निश्चितपणे जाणतो की, सर्व काही श्रीकृष्णांच्या आधिपत्याखाली आहे. (ईशावास्यमिदं सर्वम्). म्हणून तो कोणत्याही गोष्टीवर आपल्या मालकीचा खोटा दावा करत नाही. हे दिव्य ज्ञान आत्मसाक्षात्कारावर आधारित आहे. हे दिव्य ज्ञान म्हणजे, आध्यात्मिकदृष्ट्या प्रत्येक जीव हा श्रीकृष्णांचा सनातन अंश आहे, म्हणून जीवाची सनातन स्वरुपस्थिती ही कधीच श्रीकृष्णांच्या बरोबरीची किंवा त्यांच्यापेक्षा उच्च असू शकत नाही हे पूर्णतया जाणणे होय. कृष्णभावनेचे हे ज्ञान म्हणजे वास्तविक शांतीचे मूलभूत तत्व आहे.

« Previous Next »