No edit permissions for मराठी

TEXT 25

saktāḥ karmaṇy avidvāṁso
yathā kurvanti bhārata
kuryād vidvāṁs tathāsaktaś
cikīrṣur loka-saṅgraham

सक्ता:-आसक्त झालेले; कर्मणि-नियत कर्मामध्ये; अविद्वांस:- अज्ञानी; यथा- ज्याप्रमाणे; कुर्वन्ति-ते करतात; भारत - हे भरतवंशजा; कुर्यात्- केलेच पाहिजे; विद्वान्-विद्वान किंवा ज्ञानी मनुष्याने; तथा-त्याप्रमाणे; असक्त:-आसक्तीरहित; चिकीर्षु:-नेतृत्व करु इच्छिणारे; लोक-सङ्ग्रहम्-सामान्य जनांचे, लोकांचे

ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फलांच्या आसक्तीने आपले कर्म करतात त्याचप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरिता विद्वान मनुषयाने अनासक्त होऊन कर्म करावे.

तात्पर्य: कृष्णभावनाभावित असलेली व्यक्ती व कृष्णभावनाभावित नसलेली व्यक्ती यामध्ये त्यांच्या भिन्न इच्छांनुसार भेद केला जातो. कृष्णभावनाभावित व्यक्ती कृष्णभावनेच्या प्रगतीसाठी अयोग्य अशी कोणतीही गोष्ट करीत नाही कृष्णभावानाभावित मनुष्य हा, भौतिक कर्मांमध्ये अतिशय आसक्त असणाऱ्या अज्ञानी व्यक्तीप्रमाणेच कर्म करतो, पंरतु तो श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी असे कर्म करतो, तर अज्ञानी व्यक्ती आपल्या इंद्रियतृप्तीसाठी असे कर्म करीत असते. म्हणून कृष्णभावनाभावित व्यक्तीने, कर्म कसे करावे आणि कर्मफल कृष्णभावनेच्या हेतूप्रीत्यर्थ कसे उपयोगात आणावे, हे सामान्य लोकांना दाखविणे आवश्यक आहे.

« Previous Next »