No edit permissions for मराठी

TEXT 41

yoga-sannyasta-karmāṇaṁ
jñāna-sañchinna-saṁśayam
ātmavantaṁ na karmāṇi
nibadhnanti dhanañ-jaya

योग-कर्मयोगयुक्त भक्ती; सन्न्यस्त-ज्याने त्याग केला आहे; कर्माणम्-कर्मफल; ज्ञान-ज्ञानाद्वारे; सञ्छिन्न-कापून; संशयम्-संशय; आत्म-वन्तम्-आत्मस्थित; -कधीच नाही; कर्माणि-कर्मे; निबध्नन्ति-बद्ध करणारा; धनञ्जय-हे ऐश्वर्यविजयी अर्जुना.

आपल्या कर्मफलांचा त्याग करून जो भक्तियोगयुक्त कर्म करतो आणि दिव्य ज्ञानाद्वारे ज्याचे संशय नष्ट झाले आहेत तोच वास्तविकपणे आत्मस्थित आहे. याप्रमाणे हे धनंजया! तो कर्मबंधनांनी बद्ध होत नाही.

तात्पर्य: साक्षात भगवंतांनी जशी आहे तशी प्रदान केलेल्या भगवद्गीतेतील उपदेशांचे जो पालन करतो तो दव्य ज्ञानाच्या कृपेमुळे सर्व प्रकारच्या संशयांतून मुक्त होतो. कृष्णभावनाभावित असल्यामुळे भगवंतांचा अंश या नात्याने तो पूर्वीच आत्मज्ञानामध्ये स्थित झालेला असतो. म्हणून तो नि:संदेह कर्मबंधनातून सर्वथा मुक्त असतो.

« Previous Next »