No edit permissions for मराठी
TEXT 19
yathā dīpo nivāta-stho
neṅgate sopamā smṛtā
yogino yata-cittasya
yuñjato yogam ātmanaḥ
यथा-ज्याप्रमाणे; दीप:- दिवा; निवास-स्थ:- वायूरहित स्थळी; न-होत नाही; इङ्गते-हेलकावे खाणे; सा-ही; उपमा-उपमा; स्मृता-मानली जाते; योगिन:- योग्याच्या; यत-चित्तस्य-ज्याचे मन संयमित आहे; युञ्जत:- निरंतर युक्त असलेले; योगम्-ध्यानामध्ये; आत्मन:- अध्यात्मावर.
जेथे वार्याचे संचलन नाही त्या ठिकाणी ज्याप्रमाणे दीप संथपणे तेवत राहतो त्याप्रमाणे संयमित मनाचा योगी आत्मतत्वावरील आपल्या ध्यानामध्ये सदैव स्थिर असतो.
तात्पर्य: आपल्या आराध्य भगवंतांवरील अविचलित निरंतर ध्यानाद्वारे अध्यात्मामध्ये तल्लीन झालेला वास्तविक कृष्णभावनाभावित भक्त हा वायूरहित स्थळी असलेल्या दिव्याप्रमाणे स्थिर असतो.