TEXT 26
yato yato niścalati
manaś cañcalam asthiram
tatas tato niyamyaitad
ātmany eva vaśaṁ nayet
यत:यत:- जेथे जेथे; निश्चलति-विचलित होते; मन:- मन; चञ्जलम्-चंचल; अस्थिरम्- अस्थिर; तत:तत:- तेथून तेथून; नियम्य- नियमित करून; एतत्-हे; आत्मनि- आत्म्याच्या ठिकाणी; एव-निश्चितच; वशम्-वश; नयेत्-ताब्यात आणावे.
आपल्या चंचल आणि अस्थिर स्वभावामुळे मन जेथे जेथे भरकटते तेथून मनुष्याने ते खेचून घ्यावे आणि आत्म्याच्या नियंत्रणात आणावे.
तात्पर्य: मनाचा स्वभाव चंचल आणि अस्थिर आहे. परंतु आत्मसाक्षात्कारी योगी व्यक्तीने मनाद्वारे वश न होता, मनाला वश केले पाहिजे. जो मनाला आणि इंद्रियांनाही संयमित करतो, त्याला गोस्वामी किंवा स्वामी असे म्हणतात आणि मनाचे ज्याच्यावर नियंत्रण आहे त्याला गोदास किंवा इंद्रियांचा दास असे म्हणतात. गोस्वामी व्यक्तीला इंद्रियसुखाची पातळी माहीत असते. दिव्य इंद्रियसुखामध्ये, इंद्रिय ही इंद्रियांचे स्वामी, हृषीकेश, श्रीकृष्ण यांच्या सेवेमध्ये युक्त असतात. विशुद्ध इंद्रियांद्वारे केलेल्या श्रीकृष्णांच्या सेवेलाच कृष्णभावना असे म्हणतात. इंद्रियांना पूर्णपणे नियंत्रित करण्याचा हाच मार्ग आहे. अधिक काय सांगावे, योगाभ्यासाची हीच परमसिद्धी आहे.