No edit permissions for मराठी

TEXT 27

praśānta-manasaṁ hy enaṁ
yoginaṁ sukham uttamam
upaiti śānta-rajasaṁ
brahma-bhūtam akalmaṣam

 प्रशान्त-शांत, श्रीकृष्णांच्या चरणकमलांवर स्थित; मनसम्-ज्याने मन; हि-निश्‍चितच्; एनम्-हे; योगिनम्-योगी; सुखम्-सुख; उत्तमम्-परमोच्च; उपैति-प्राप्त करतो; शान्त-रजसम्-ज्यांचा रजोगुण शांत झाला आहे; ब्रह्म-भूतम्-ब्रह्माशी संबंधित आपल्या स्वरुपाच्या ज्ञानाद्वारे प्राप्त झालेली मुक्ती; अकल्मषम्-पूर्वसंचित पापांतून मुक्त.

ज्या योगी मनुष्याचे मन माझ्यावर स्थिर झाले आहे, त्याला निश्चितच दिव्य सुखाची परमावधी प्राप्त होते. तो रजोगुणाच्या पलीकडे असतो, त्याला ब्रह्माशी असलेल्या गुणात्मक स्वरुपाचा साक्षात्कार होतो आणि याप्रमाणे तो आपल्या पूर्वकर्माफलांपासून मुक्त होतो.

तात्पर्य: भौतिक दोषांतून मुक्त होणे आणि भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये स्थित होणे म्हणजेच ब्रह्मभूत अवस्था होय. मद्भक्ति लभे पराम् (भगवद्गीता 18.54) जोपर्यत मनुष्याचे मन भगवंतांच्या चरणकमलांवर स्थित होत नाही तोपर्यंत तो ब्रह्मभूत अवस्थेमध्ये राहू शकत नाही. स वै मन: कृष्णपदारविन्दयो: भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये निरंतर युक्त राहणे किंवा कृष्णभावनाभावित राहणे म्हणजेख, सर्व भौतिक दोषांतून आणि रजोगुणातून मुक्त होणे होय.

« Previous Next »