No edit permissions for मराठी

TEXT 3

ārurukṣor muner yogaṁ
karma kāraṇam ucyate
yogārūḍhasya tasyaiva
śamaḥ kāraṇam ucyate

 आरूरूक्षो:- ज्याने योगाचा नुकताच प्रारंभ केला आहे; मुने-मुनीच्या; योगम्-अष्टांगयोग; कर्म-कर्म; कारणम्-कारण किंवा माध्यम; उच्यते-म्हटले जाते; योग-अष्टांगयोग; आरुढस्य-ज्याने साध्य केला आहे; तस्य-त्याच्या; एव-खचितच; शम:-सर्व भौतिक क्रियांचे शमन; कारणम्-कारण; उच्यते-म्हटले जाते.

जो अष्टांगयोगामध्ये नवसाधक आहे, त्याच्यासाठी कर्म हे साधन असल्याचे म्हटले जाते आणि ज्याने पूर्वीच योग साध्य केला आहे त्याच्यासाठी सर्व भौतिक क्रियांचे शमन हे साधन असल्याचे म्हटले जाते.

तात्पर्य: भगवंतांशी युक्त होण्याच्या पद्धतीलाच योग म्हटले जाते. या योगाची तुलना एखाद्या शिडीशी करता येईल, त्याद्वारे सर्वोच्च आध्यात्मिक साक्षात्कार होतो. या शिडीचा प्रारंभ जीवाच्या अत्यंत कनिष्ठ भौतिक अवस्थेपासून होतो आणि विशुद्ध आध्यात्मिक जीवनाच्या परिपूर्ण आत्मसाक्षात्काराप्रत त्या उन्नत आवस्थाची उन्नती होते. विविध उन्नत अवसथांनुसार शिडीच्या विविध भागांना विविध नावांद्वारे जाणले जाते, परंतु एकंदरीत संपूर्ण शिडीला योग म्हटले जाते आणि याचे ज्ञानयोग,  ध्यानयोग आणि भक्तियोग असे तीन विभाग करता येतात. शिडीच्या प्रारंभिक भागाला योगारुरुक्षु अवस्था म्हटले जाते आणि सर्वोच्च भागाला योगारुढ म्हटले जाते.

     अष्टांगयोग पद्धतीच्या बाबतीत, जीवनाच्या नियामक तत्वांद्वारे आणि विविध आसनांच्या अभ्यासद्वारे (जो साधारणपणे शारीरिक व्यायामच असतो) ध्यानस्थ होण्याच्या प्रारंभिक प्रयत्नांना भौतिक सकाम क्रिया समजले जाते. या सर्व क्रियांद्वारे, इंद्रिये संयमित करण्यासाठी, परिपूर्ण मानसिक संतुलनाची प्राप्ती करण्यात मदत होते. मनुष्य जेव्हा ध्यानाच्या अभ्यासात प्रवीण होतो तेव्हा तो विचलित करणाऱ्यासर्व मानसिक क्रियांचे शमन करतो.

     तथापि, कृष्णभावनाभावित मनुष्य हा प्रारंभापासूनच ध्यानाच्या स्तरावर स्थित असतो, कारण तो श्रीकृष्णांच्या निरंतर  स्मरण करीत असतो आणि श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये निरंतर युक्त असल्यामुळे त्याने सर्व भौतिक क्रियांचे शमन केलेले असते.

« Previous Next »