No edit permissions for मराठी

TEXT 4

yadā hi nendriyārtheṣu
na karmasv anuṣajjate
sarva-saṅkalpa-sannyāsī
yogārūḍhas tadocyate

यदा-जेव्हा; हि-निश्‍चितपणे; -नाही; इन्द्रिय-अर्थेषु-इंद्रियतृप्तीमध्ये; -कधीच नाही; कर्मसु-सकाम कर्मांमध्ये; अनुषज्जते-युक्त होतो; सर्व-सङ्कल्प-सर्व भौतिक इच्छांचा; सन्यासी-संन्यासी; योग-आरुढ:- योगारुढ किंवा योगामध्ये उन्नत: तदा-त्या वेळी; उच्यते-म्हटला जातो.

जेव्हा मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांचा त्याग करतो, तसेच इंद्रियतृप्त्यर्थ कर्मांमध्ये आणि सकाम कर्मांमध्येही प्रवृत्त होत नाही तेव्हा तो योगारूढ झाल्याचे म्हटले जाते.

तात्पर्य: जेव्हा मनुष्य भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो स्वत:ही तृप्त होतो आणि याप्रमाणे तो इंद्रियतृप्ती किंवा सकाम कर्मांमध्ये संलग्न होत नाही. अन्यथा, कर्म केल्यावाचून राहूच शकत नसल्यामुळे त्याला इंद्रियतृप्तीमध्ये रत व्हावेचव लागते. कृष्णभावनेशिवाय तो सतत स्वकेंद्रित किंवा व्यापक स्वार्थकर्मांच्या शोधातच असतो. परंतु कृष्णभावनाभावित मनुष्य हा श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिता सर्व काही करू शकतो आणि त्यायोगे तो इंद्रियतृप्तीपासून पूर्णपणे अनासक्त राहू शकतो. ज्या मनुष्याला या गोष्टीचा साक्षात्कार झालेला नाही, त्याला योगरुपी सोपानाच्या सर्वोच्च स्तराप्रत उन्नत होण्यापूर्वी, भौतिक इच्छांतून मुक्त होण्यासाठी यंत्रवत प्रयास करावे लागतात.

« Previous Next »