No edit permissions for मराठी

TEXT 45

prayatnād yatamānas tu
yogī saṁśuddha-kilbiṣaḥ
aneka-janma-saṁsiddhas
tato yāti parāṁ gatim

प्रयत्नात्-कठोर अभ्यासाने; यतमानः-प्रयत्न करीत; तु—आणि; योगी-असा योगी; संशुद्ध-शुद्ध होतो; किल्बिष:-त्यांची सर्व पापे; अनेक-अनेकानेक; जन्म-जन्मजन्मांतर; संसिद्धः-परिपूर्णता प्राप्त करून; ततः-त्यानंतर; याति-प्राप्त करतो; पराम्-परम किंवा सर्वश्रेष्ठ; गतिम्-गती किंवा स्थान.

आणि जेव्हा योगी, सर्व पापांपासून शुद्ध होऊन अधिक प्रगती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, तेव्हा अन्ततः अनेकानेक जन्मजन्मान्तराच्या अभ्यासानंतर सिद्धी संपादित केल्यावर त्याला परमलक्ष्याची प्राप्ती होते.

तात्पर्य: विशेषकरून सदाचारी, श्रीमंत किंवा पवित्र कुळात जन्म घेतलेल्या मनुष्याला योगाभ्यास करण्यासाठी अनुकूल असलेल्या आपल्या सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव होते. म्हणून दृढ निश्चयाने आपल्या अपु-या राहिलेल्या अभ्यासाचा तो पुन्हा प्रारंभ करतो. अशा रीतीने तो पूर्णपणे सर्व भौतिक कल्मषांतून मुक्त होतो. त्यानंतर त्याला परमोच्च सिद्धीची, कृष्णभावनेची प्राप्ती होते. कृष्णभावना म्हणजे, सर्व कल्मषांतून मुक्त झालेली परिपूर्ण स्थिती आहे. भगवद्गीता (७.२८) याला पुढीलप्रमाणे पुष्टी देते.

येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम्‌ ।
ते द्वन्द्वमोहनिर्मुत्का भजन्ते मे दृढव्रतः ।।

          अनेकानेक जन्मांमध्ये पुण्यकर्म केल्यानंतर, जेव्हा मनुष्य सर्व पापांतून आणि मोहमय द्वंद्वातून मुक्त होतो तेव्हा तो भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये युक्त होतो.

« Previous Next »