No edit permissions for मराठी

TEXT 46

tapasvibhyo ’dhiko yogī
jñānibhyo ’pi mato ’dhikaḥ
karmibhyaś cādhiko yogī
tasmād yogī bhavārjuna

तपस्विभ्यः-तपस्वींपेक्षा; अधिक:-अधिक किंवा श्रेष्ठ; योगी-योगी; ज्ञानिभय:-ज्ञानी व्यतीपेक्षा, अपि-सुद्धा; मत:-मानला जातो; अधिक:-अधिक किंवा श्रेष्ठ; कर्मिभ्य:-सकाम कर्मी व्यक्तींपेक्षा; -सुद्धा; अधिकः-श्रेष्ठ; योगी-योगी; तस्मात्-म्हणून; योगी-योगी; भव—हो; अर्जुन—हे अर्जुन.

योगी मनुष्य हा तपस्वी, ज्ञानी आणि सकाम कर्मी व्यक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना! तू सर्व परिस्थितीत योगी हो.

तात्पर्य: जेव्हा आपण योगासंबंधी बोलतो तेव्हा आपण परम सत्याशी असणा-या आपल्या संबंधाचा निर्देश करतो. या पद्धतीला विविध अभ्यासकांनी योजिलेल्या विशिष्ट पद्धतीनुसार निरनिराळी मते दिली आहेत. जेव्हा ही योगपद्धती मुख्यत: सकाम कर्माशी संबंधित असते तेव्हा त्या पद्धतीला कर्मयोग असे म्हणतात, ज्ञानाशी संबंधित असताना ज्ञानयोग आणि भगवंतांच्या प्रेममयी सेवेशी संबंधित असते तेव्हा त्या पद्धतीला भक्तियोग असे म्हणतात. पुढील श्लोकात सांगितले जाईल की, कृष्णभावना म्हणजे सर्व योगांची परिपूर्णता आहे. या ठिकाणी भगवंतांनी योगाच्या श्रेष्ठत्वाला पुष्टी दिली आहे, परंतु हा योग भक्तियोगापेक्षा श्रेष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले नाही. भक्तियोग हा आध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्ण आहे म्हणून यापेक्षा श्रेष्ठ असा इतर कोणताही योग असू शकत नाही. आत्मज्ञानाशिवाय केवळ तपस्या ही अपूर्ण आहे. भगवंतांना शरण गेल्याविना केवळ ज्ञानही अपूर्ण आहे आणि कृष्णभावनेशिवाय सकाम कर्म म्हणजे कालापव्ययच आहे. म्हणून या ठिकाणी सांगण्यात आलेली श्रेष्ठ आणि प्रशंसनीय योगपद्धती म्हणजे भक्तियोग होय आणि याचे  अधिक विस्तृत विवेचन पुढील श्लोकात करण्यात आले आहे.

« Previous Next »