No edit permissions for मराठी

TEXT 13

mahātmānas tu māṁ pārtha
daivīṁ prakṛtim āśritāḥ
bhajanty ananya-manaso
jñātvā bhūtādim avyayam

महा-आत्मानः-महात्माजन; तु—परंतु, माम्—मला; पार्थ—हे पार्थ; दैवीम्—दैवी; प्रकृतिम्प्रकृती; आश्रिताः-आश्रय घेतलेले; भजन्ति-सेवा करतात; अनन्य-मनसः-अचल, अनन्य मनाने; ज्ञात्वा-जाणून; भूत-सृष्टीच्या; आदिम्-आदिस्थान किंवा मूळ; अव्ययम्-अविनाशी.

हे पार्थ! मोहित न झालेले महात्मेजन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदिकारण आणि अविनाशी, पुरुषोत्तम श्रीभगवान म्हणून जाणतात.

तात्पर्य: या शलोकामध्ये महात्मा या शब्दाची व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे, महात्म्याचे सर्वप्रथम लक्षण असते की, तो दैवी प्रकृतीमध्ये स्थित असतो. तो भौतिक प्रकृतीच्या अधीन नसतो. हे कसे बरे होते? याचे वर्णन सातव्या अध्यायात करण्यात आले आहे. जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांना शरण जातो तो तात्काळ भौतिक प्रकृतीच्या आधिपत्यामधून मुक्त होतो. हीच पात्रता आहे. जेव्हा जीव भगवंतांना शरण जातो तेव्हा तात्काळ तो भौतिक प्रकृतीमधून मुक्त होतो. ही प्राथमिक पायरी आहे. जीव हे भगवंतांची तटस्था शक्ती असल्यामुळे जेव्हा ते भौतिक प्रकृतीच्या तावडीतून मुक्त होतात तेव्हा ते आध्यात्मिक प्रकृतीच्या आश्रयाखाली जातात. अध्यात्मिक प्रकृतीच्या मार्गदर्शनालाच दैवी प्रकृती असे म्हटले जाते. म्हणून  भगवंतांना शरण गेल्यामुळे जेव्हा जीवाची उन्नती होते तेव्हा त्याला महात्मा पदाची प्राप्ती होते.

          श्रीकृष्णांव्यतिरितक्त अन्य कोणत्याही गोष्टींचे ध्यान महात्मा करीत नाही. तो निश्चितपणे जाणतो की, श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण, आदिपुरुष आहेत. याबाबतीत त्याला मुळीच संदेह नसतो. अशा महात्म्याची इतर महात्म्यांच्या  किंवा शुद्ध भक्तांच्या सत्संगामुळे प्रगती होते. विशुद्ध भक्त हे श्रीकृष्णांच्या इतर रूपांकडेही उदाहरणार्थ, चतुर्भुज महा-विष्णुरूपाकडेही आकृष्ट होत नाहीत. ते केवळ द्विभुजधारी कृष्णरूपाकडेच आकृष्ट होतात. ते श्रीकृष्णांच्या इतर रूपांकडे तसेच देवतेच्या किंवा मानवाच्या इतर रूपांकडे मुळीच आकर्षित होत नाहीत. ते कृष्णभावनेमध्ये युक्त होऊन केवळ श्रीकृष्णांचेच ध्यान करतात. ते कृष्णभावनेमध्ये युक्त होऊन भगवंतांच्या अखंड सेवेमध्ये दृढपणे सदैव रममाण झालेले असतात.

« Previous Next »