TEXT 29
vepathuś ca śarīre me
roma-harṣaś ca jāyate
gāṇḍīvaṁ sraṁsate hastāt
tvak caiva paridahyate
वेपथु: शरीराचे कंपन; च- सुद्धा; शरीरे-शरीराला; मे-माझ्या; रोम-हर्ष:-रोमांचित होणे; च-सुद्धा; जायते-उठले आहेत; गाण्डीवम्-अर्जुनाचे धनुष्य; स्त्रंसते-गळू लागले आहे; हस्तात्-हातातून; त्वक्-त्वचा; च-सुद्धा; एव-खचित; परिदह्यते-दाह होत आहे.
माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे, माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत, हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे आणि त्वचेचा दाह होत आहे.
तात्पर्य: शरीराचे दोन प्रकारे कंपन होऊ शकते आणि रोमांचही शरीरावर दोन प्रकारे उभे राहू शकतात. अशा घटना एकतर आध्यात्मिक भावोत्कटतेमुळे होऊ शकतात किंवा भौतिक परिस्थितीमधील अतिभयामुळे होऊ शकतात. दव्यि साक्षात्कारामध्ये भीती अजिबात नसते. या परिस्थितीतील अर्जुनाची लक्षणे ही जीवित हानीच्या भौतिक भयामुळे प्रकट झाली होती. इतर लक्षणांवरूनही हे स्पष्टपणे कळून आले. तो इतका अधीर झाला की, त्याचे प्रसिद्ध गांडीव धनुष्य त्याच्या हातातून गळून पडले आणि अंत:करणात दाह होत असल्यामुळे त्याला आपल्या त्वचेचाही दाह होत आहे असे वाटू लागले. जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेमुळे अथवा देहात्मबुद्धीमुळे या सर्व गोष्टी घडतात.