No edit permissions for मराठी

TEXT 26

aśvatthaḥ sarva-vṛkṣāṇāṁ
devarṣīṇāṁ ca nāradaḥ
gandharvāṇāṁ citrarathaḥ
siddhānāṁ kapilo muniḥ

अश्वत्थ:-अश्वत्थ वृक्ष, वटवृक्ष; सर्व-वृक्षाणाम्-सर्व वृक्षांमध्ये; देव-ऋषीणाम्-सर्व देवर्षीमध्ये; -आणि; नारद-नारद; गन्धर्वाणाम्-गंधर्वलोकातील गंधर्वांमध्ये; चित्ररथ:- चित्ररथ; सिद्धानाम्-सर्व सिद्धपुरुषांमध्ये; कपिलः मुनिः-कपिलमुनी.

सर्व वृक्षांमध्ये अश्वत्थ वृक्ष मी आहे आणि सर्व देवर्षीमध्ये नारद मी आहे. गंधर्वांमध्ये चित्ररथ मी आहे आणि सर्व सिद्ध पुरुषांमध्ये कपिलमुनी मी आहे.

तात्पर्य: अश्वत्थ वृक्ष (वटवृक्ष) हा सर्वांत उंच आणि अत्यंत सुंदर वृक्षांपैकी एक आहे. भारतातील लोक आपल्या प्रात:कालीन प्रतिदिन पूजन-अर्चन विधीमध्ये वटवृक्षाचेही पूजन करतात. देवदेवतांमध्ये नारदांचीही ते पूजा करतात, कारण नारद सर्वश्रेष्ठ भक्त आहेत. म्हणून नारद हे भक्त रूपामध्ये श्रीकृष्णांचे प्रतिनिधी आहेत. गंधर्वलोकांमधील सर्व गंधर्व अत्यंत मधुर आवाजात गायन करतात आणि या गंधर्वांमध्ये चित्ररथ सर्वोत्तम आहे. सिद्ध मनुष्यांपैकी देवहूतिपुत्र कपिल मुनी हे श्रीकृष्णांचे रूप आहे. कपिलमुनींना श्रीकृष्णांचा अवतार मानण्यात त्यानंतर आणखी एक कपिल विख्यात झाला; पण त्याने सांगितलेले तत्त्वज्ञान हे नास्तिकवादी आहे, म्हणून या दोघांमध्ये फार अंतर आहे.

« Previous Next »