No edit permissions for मराठी

TEXT 34

droṇaṁ ca bhīṣmaṁ ca jayadrathaṁ ca
karṇaṁ tathānyān api yodha-vīrān
mayā hatāṁs tvaṁ jahi mā vyathiṣṭhā
yudhyasva jetāsi raṇe sapatnān

द्रोणम् च-द्रोणसुद्धा; भीष्मम् -भीष्मही; जयद्रथम् -जयद्रथही; कर्णम्-कर्णः; तथा— तथा; अन्यान्-अन्य; अपि-खचितच; योध-वीरान्-महान योद्धे;मया- माझ्याकडून; हताम्-पूर्वीच मारलेले; त्वम्-तू; जहि-मार; मा-नको; व्यथिठाः-व्यथित; युध्यस्व-केवळ युद्ध कर; जेता असि-तू जिंकशील; रणे-युद्धात; सपत्नान्-शत्रू

द्रोण, भीष्म, कर्ण आणि इतर महान योद्धयांना मी पूर्वीच मारलेले आहे. म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नको. केवळ युद्ध कर. यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील.

तात्पर्य : प्रत्येक योजना ही भगवंतांनी केलेली असते. परंतु आपल्या भक्तावर भगवंतांची इतकी विशेष कृपा असते की, जे भक्त त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या योजना कार्यान्वित करतात त्या भक्तांनाच भगवंत सारे श्रेय देतात. म्हणून जीवनाचे रहाटगाडे अशा पद्धतीने चालवावे, जेणेकरून प्रत्येकजण कृष्णभावनाभावित कर्म करू शकेल आणि आध्यात्मिक गुरूच्या माध्यमाने भगवंतांना जाणू शकेल. भगवंतांची इच्छा केवळ त्यांच्या कृपेनेच जाणता येते आणि भक्तांची योजना हीच भगवंतांची योजना असते. मनुष्याने अशा भगवंतांच्या योजनांचे अनुसरण करावे आणि जीवनाच्या संघर्षात यशस्वी व्हावे.

« Previous Next »