TEXT 44
tasmāt praṇamya praṇidhāya kāyaṁ
prasādaye tvām aham īśam īḍyam
piteva putrasya sakheva sakhyuḥ
priyaḥ priyāyārhasi deva soḍhum
तस्मात्-म्हणून; प्रणम्य-प्रणाम करून; प्रणिधाय-प्रणिपात; कायम्-देह; प्रसादये- कृपायाचना करण्यासाठी; त्वाम्-तुम्हाला; अहम्-मी; ईशम्-भगवंतांना; ईडयम्-पूजनीय; पिता इव-पिता किंवा पित्याप्रमाणे पूज्य; पुत्रस्य-पुत्राशी; सखा इव-सख्याप्रमाणे किंवा मित्राप्रमाणे; सख्युः-मित्राशी; प्रियः—प्रियकर; प्रियायाः—प्रिय व्यक्तींशी; अर्हसि—तुम्ही असले पाहिजे, देव—हे भगवन्; सोढुम्—सहनशील,
प्रत्येक जीवाचे आराध्य परमेश्वर तुम्हीच आहात. मी साष्टांग प्रणिपात करून तुमच्याकडे कृपायाचना करीत आहे. ज्याप्रमाणे पिता आपल्या पुत्राचा उर्मटपणा सहन करतो किंवा एक मित्र दुस-या मित्राचा उद्धटपणा सहन करतो किंवा पत्नी आपल्या पतीचा उद्दामपणा सहन करते त्याप्रमाणे कृपया मी केलेल्या अपराधांची मला क्षमा करा.
तात्पर्य: कृष्णभक्त आणि श्रीकृष्ण यांचे संबंध विविध प्रकारचे असतात. कोणी श्रीकृष्णांना पुत्र तर कोणी पती अथवा मित्र अथवा स्वामी मानतो. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये सख्यभाव किंवा मित्रत्वाचा संबंध आहे. ज्याप्रमाणे पिता पुत्राचे, पती पत्नीचे किंवा स्वामी सेवकांचे अपराध सहन करतात त्याचप्रमाणे श्रीकृष्णही भक्तांचे अपराध सहन करतात.