TEXT 17
yo na hṛṣyati na dveṣṭi
na śocati na kāṅkṣati
śubhāśubha-parityāgī
bhaktimān yaḥ sa me priyaḥ
य:-जो; न-कधीही नाही; हष्यति-हर्षित होतो; न-कधीही नाही; द्वेष्टि-दुःखी होतो; न-कधीही नाही; शोचति-शोक करतो; न-कधीही नाही; काङ्क्षति-इच्छा करतो; शुभ-शुभ; अशुभ-आणि अशुभ; परित्यागी-त्याग करणारा; भक्ति-मान्—भक्त; यः-जो; सः-तो; मे-मला; प्रियः-प्रिय.
जो हर्षितही होत नाही किंवा दुःखही करीत नाही, शोकही करीत नाही किंवा आकांक्षाही करीत नाही आणि ज्याने शुभाशुभ गोष्टींचा त्याग केला आहे, असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे.
तात्पर्य: भौतिक लाभामुळे शुद्ध भक्त हर्षित होत नाही किंवा दुःखीही होत नाही. तसेच आपल्याला एखादा पुत्र किंवा शिष्य मिळविण्यास तो फारसा उत्सुक नसतो किंवा ते न मिळाल्यामुळे तो दुःखीही होत नाही. आपल्याकडील अतिप्रिय वस्तू गमावल्यामुळे तो शोक करीत नाही, त्याचप्रमाणे इच्छित वस्तू प्राप्त न झाल्यास व्यथित होत नाही. तो सर्व प्रकारच्या शुभाशुभ पापकर्माच्या पलीकडे असतो. भगवंतांच्या संतुष्टीप्रीत्यर्थ तो सर्व प्रकारची संकटे सहन करण्यास तयार असतो. त्याच्या भक्तीमध्ये कोणतीही गोष्ट बाधक ठरत नाही. असा भक्त श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे.