No edit permissions for मराठी

TEXT 32

anāditvān nirguṇatvāt
paramātmāyam avyayaḥ
śarīra-stho ’pi kaunteya
na karoti na lipyate

अनादित्वात्-अनादित्व किंवा नित्यतेमुळे; निर्गुणत्वात्-दिव्य असल्यामुळे; परम-भौतिक प्रकृतीच्या अतीत; आत्मा-आत्मा; अयम्-हा;अव्ययः-अव्यय; शरीर-स्थ:-शरीरामध्ये वास करणारा, अपि-तरी, कौन्तेय-हे कौंतेया; करोति-काहीच करीत नाही; न लिप्यते-तसेच लिप्तही होत नाही.

जे अनादित्वाच्या दृष्टींनी युक्त आहेत ते पाहू शकतात की, अव्ययी आत्मा हा दिव्य, शाश्वत आणि त्रिगुणातीत आहे. हे अर्जुना! भौतिक शरीराच्या संपर्कात असून देखील आत्मा काही करीतही नाही किंवा कोणत्या गोष्टीमुळे लिप्तही होत नाही.

तात्पर्य: भौतिक शरीराच्या जन्माबरोबरच जीवाचाही जन्म झाल्याचे प्रतीत होते, परंतु वस्तुतः जीव हा शाश्वत, अजन्मा आहे आणि तो प्राकृत शरीरामध्ये स्थित असला तरीही तो दिव्य आणि शाश्वत आहे. म्हणून त्याचा विनाश होऊ शकत नाही. स्वरूपतः तो आनंदमयी आहे. जीव स्वतःहून कोणत्याही भौतिक कार्यामध्ये संलग्न होत नाही, म्हणून त्याने भौतिक देहाच्या संपर्कात असताना केलेली कमें त्याला लिप्त करू शकत नाहीत.

« Previous Next »