No edit permissions for मराठी

TEXT 4

tat kṣetraṁ yac ca yādṛk ca
yad-vikāri yataś ca yat
sa ca yo yat-prabhāvaś ca
tat samāsena me śṛṇu

तत्-ते; क्षेत्रम्-क्षेत्र; यत्-काय; -सुद्धा; यादृक्-यथारूप; -सुद्धा; यत्-ज्या; विकारि-विकार किंवा बदल;यतः-ज्यापासून; -सुद्धा; यत्-ज्या; सः-तो; -सुद्धा; यः-जो; यत्-ज्या; प्रभावः-प्रभाव; -सुद्धा; तत्-ते; समासेन-सारांशरूपाने; मे-माझ्याकडून; भूणु-ऐक.

आता कृपया माझ्याकडून क्षेत्र आणि त्याचे स्वरूप, त्याच्यामध्ये कोणते बदल होतात, त्याची निर्मिती केव्हा होते, त्याचा ज्ञाता कोण आहे आणि क्षेत्रज्ञाचा काय प्रभाव आहे याचे संक्षिप्त वर्णन ऐक.

तात्पर्य: भगवंत क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या स्वरूपाचे वर्णन करीत आहेत. या शरीराचे स्वरूप काय आहे, कोणत्या पदार्थांपासून हा देह बनलेला आहे, कोणाच्या नियंत्रणाखाली हा देह क्रियाशील आहे, त्याच्यात बदल कसे घडून येतात, हे बदल कोठून येतात, त्याची कारणे कोणती, त्याचे प्रयोजन काय आहे, आत्म्याचे परमलक्ष्य काय आहे आणि जीवाचे वास्तविक रूप कसे आहे. या सर्व गोष्टींचे मनुष्याला ज्ञान असले पाहिजे. आत्मा आणि परमात्मा यांच्यातील भेद, त्यांचा प्रभाव, त्यांची शक्ती इत्यादींचेही ज्ञान असणे आवश्यक आहे. मनुष्याने केवळ ही भगवद्गीता प्रत्यक्षपणे, भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे जाणून घेतली पाहिजे. असे केल्याने या सर्व गोष्टी स्पष्ट होतील. प्रत्येक देहातील भगवंत आणि जीव हे एकच आहेत अशी समजूत म्हणजे शक्तिमान आणि शक्तिहीन यांना सारखेच समजण्याप्रमाणे आहे.

« Previous Next »