No edit permissions for मराठी

TEXT 14

yadā sattve pravṛddhe tu
pralayaṁ yāti deha-bhṛt
tadottama-vidāṁ lokān
amalān pratipadyate

यदा-जेव्हा; सत्त्वे-सत्वगुणामध्ये; प्रवृद्धे-वृद्धी झाल्यावर; तु-परंतु; प्रलयम्-प्रलय; याति-जातो; देह-भूत्-देहधारी; तदा-त्या वेळी; उत्तम-विदाम्-महर्षीच्या; लोकान्ग्रहलोक, अमलान्-पवित्र; प्रतिपद्यते-प्राप्त होती.

जेव्हा मनुष्याचा सत्त्वगुणामध्ये मृत्यू होतो, तेव्हा तो महर्षीच्या उच्चतर पवित्र ग्रहलोकांना प्राप्त होतो.

तात्पर्यः सत्त्वगुणी मनुष्याला, ब्रह्मलोक, जनलोक इत्यादींसारख्या उच्चतर लोकांची प्राप्ती होते आणि त्या ठिकाणी तो दैवी सुखाचा उपभोग घेतो. अमलान् हा शब्द महत्वपूर्ण आहे. त्याचा अर्थ, 'रज आणि तमोगुणातून मुक्त' असा आहे. भौतिक जगतामध्ये अशुद्धता आहे, परंतु सत्वगुण हा भौतिक जगतातील सर्वाधिक शुद्ध रूप आहे. निरनिराळ्या प्रकारच्या जीवांसाठी निरनिराळ्या प्रकारचे ग्रहलोक आहेत. ज्यांचा सत्त्वगुणामध्ये मृत्यू होतो त्यांची महान भक्त आणि महर्षी वास करीत असलेल्या उच्चतर लोकांमध्ये उन्नती होते.

« Previous Next »