TEXT 11
aphalākāṅkṣibhir yajño
vidhi-diṣṭo ya ijyate
yaṣṭavyam eveti manaḥ
samādhāya sa sāttvikaḥ
अफल-आकाङ्क्षभिः-फलेच्छारहित असणारे; यज्ञः-यज्ञ; विधि-दिष्टः-शास्त्रविधीनुसार; य:-जो; इज्यते-केला जातो; यष्टव्यम्-केला पाहिजे; एव-निश्चितपणे; इति-याप्रमाणे; मनः-मन; समाधाय-स्थिर करून; सः -तो; सात्त्विकः-सत्त्वगुणामध्ये.
फलाची आकांक्षा न करणारे, आपले कर्तव्य म्हणून शास्त्रविधीनुसार जो यज्ञ करतात तो सात्विक यज्ञ होय,
तात्पर्य: मनामध्ये काही तरी हेतू ठेवून यज्ञ करणे ही सामान्य प्रवृत्ती असते; परंतु या ठिकाणी सांगण्यात आले आहे की, फलाची आशा न ठेवता यज्ञ करावा. कर्तव्य म्हणूनच यज्ञ केला पाहिजे. याबाबतीत मंदिरातील कर्मकांडाचे उदाहरण योग्य आहे. सामान्यतया असे कर्मकांड भौतिक लाभप्राप्तीच्या हेतूने केले जाते, परंतु ते सात्विक असू शकत नाही. कर्तव्य म्हणून मनुष्याने मंदिरात गेले पाहिजे व तेथे त्याने भगवंतांना वंदन करावे आणि पुष्प, नैवेद्य इत्यादी अर्पण करावे. प्रत्येकाला वाटते की, भगवंतांची केवळ आराधना करण्याकरिता मंदिरात जाणे व्यर्थ आहे. आर्थिक लाभासाठी आराधना करणे हे शास्त्रसंमत नाही. अर्चाविग्रहाला दंडवत करण्याकरिताच केवळ मनुष्याने मंदिरात गेले पाहिजे. यामुळे मनुष्य सत्वगुणामध्ये स्थित होईल. प्रत्येक सुसंस्कृत मनुष्याचे कर्तव्य आहे की, त्याने शास्त्रोत विधींचे पालन केले पाहिजे. आणि भगवंतांना प्रणाम केला पाहिजे