No edit permissions for मराठी

TEXT 16

tatraivaṁ sati kartāram
ātmānaṁ kevalaṁ tu yaḥ
paśyaty akṛta-buddhitvān
na sa paśyati durmatiḥ

तत्र-तिथे; एवम्-असे; सति-असल्यामुळे; कर्तारम्-कर्ता; आत्मानम्-स्वत:ला; केवलम्-केवळ; तु-परंतु;:-जो; पश्यति-पाहतो; अकृत-बुद्धित्वात्-बुद्धी नसल्यामुळे; -नाही; सः-तो; पश्यति-पाहतो; दुर्मतिः -मूर्ख

म्हणून या पाच कारणांचा विचार न करता, ज्याला वाटते की, तो एकमेव कर्ता आहे तो खचितच मूर्ख आहे व तो गोष्टींना यथार्थ रूपात पाहू शकत नाही.

तात्पर्य: मूर्ख मनुष्याला समजत नाही की, परमात्मा त्याच्या अंतरात मित्र म्हणून स्थित आहे व त्याच्या कर्माचे संचालन करीत आहे. जरी स्थान, कर्ता, प्रयत्न व इंद्रिये ही भौतिक कारणे असली तरी अंतिम कारण स्वत: भगवानच असतात. म्हणून मनुष्याने केवळ या चार भौतिक कारणांनाच पाहू नये तर परम कारणाकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. जो परमात्म्याला पाहात नाही तो स्वत:लाच कर्ता मानीत असती.

« Previous Next »