No edit permissions for मराठी

TEXT 27

rāgī karma-phala-prepsur
lubdho hiṁsātmako ’śuciḥ
harṣa-śokānvitaḥ kartā
rājasaḥ parikīrtitaḥ


रागी-अत्यंत आसक्तः कर्म-फल-कर्मफल; प्रेप्सुः-इच्छा करणारा; लुब्धः-लोभी; हिंसाआत्मक:-नेहमी ईर्षाळू; अशुचिः-अपवित्र; हर्ष-शोक-अन्वित:-हर्ष आणि शोक यांनी युक्त; कर्ता-असा कर्ता, राजस:-रजोगुणी; परिकीर्तित:-घोषित केला जाती.

जो कर्ता, कर्म आणि कर्मफलांप्रति आसक्त होऊन फळांना भोगू इच्छितो आणि जो लोभी, ईर्षाळू, अपवित्र व सुखदुःखामुळे विचलित होणारा असतो, त्याला रजोगुणी कर्ता म्हटले जाते.

तात्पर्य: मनुष्य एखाद्या कर्मामध्ये किंवा त्या कर्माच्या फळाविषयी अत्यंत आसक्त झालेला असतो. कारण संसार, घर-दार, पत्नी-मुले इत्यादींविषयी त्याला फार आसक्ती असते. अशा मनुष्याला जीवनात आपली उन्नती व्हावी अशी इच्छा नसते. आपल्याला हे जग भौतिकरीत्या अधिकाधिक सुखकारक कसे होईल, याचाच केवळ तो विचार करतो. साधारणपणे तो फार लोभी असतो व त्याला वाटते की, आपण जे काही मिळविले आहे ते चिरस्थायी आहे आणि कधीही नाश पावणारे नाही. असा मनुष्य इतरांचा मत्सर करतो आणि स्वत:च्या इंद्रियतृप्तीकरिता कोणतेही पापकर्म करण्याची त्याची तयारी असते. म्हणून असा मनुष्य अपवित्र असतो आणि आपण जे मिळवितो ते निष्कलंक असते की भ्रष्ट असते याची तो पर्वा करीत नाही. आपले कर्म सफल झाले की तो फार सुखी असतो आणि जेव्हा त्याचे कर्म असफल होते तेव्हा तो फार दु:खी होतो. अशा प्रकारचा मनुष्य रजोगुणी कर्ता होय.

« Previous Next »