No edit permissions for मराठी

TEXT 39

yad agre cānubandhe ca
sukhaṁ mohanam ātmanaḥ
nidrālasya-pramādotthaṁ
tat tāmasam udāhṛtam

यत्-जे; अग्रे-प्रारंभी; -सुद्धा; अनुबन्धे-शेवटी; -सुद्धा; सुखम्-सुख; मोहन-मोहमयी; आत्मन:-आत्म्याच्या; निद्रा-निद्रा; आलस्य-आळस; प्रमाद-आणि प्रमाद; उत्थम्—उत्पन्न; तत्—ते; तामसम्—तामसिक; उदाहतम्—म्हटले जाते.

आणि जे सुख स्वरूपसाक्षात्काराकडे लक्ष देत नाही, जे आरंभापासून शेवटपर्यंत मोहमयी असते आणि जे निद्रा, आळस व प्रमाद यापासून उत्पन्न होते त्या सुखाला तामसिक सुख म्हटले जाते.

तात्पर्य: जो मनुष्य आळस आणि निद्रा यातच सुख मानतो तो निश्चितच तमोगुणी होय. तसेच ज्याला कार्य-अकार्य याची कल्पना नसते तो सुद्धा तमोगुणी होय. तमोगुणी मनुष्यासाठी सर्व काही मोहमयीच असते. रजोगुणी मनुष्याला आरंभी क्षणिक सुख आणि शेवटी दु:ख असते, परंतु तमोगुणी मनुष्याला आरंभी व शेवटी केवळ दुःखच असते.

« Previous Next »