No edit permissions for मराठी

TEXT 9

kāryam ity eva yat karma
niyataṁ kriyate ’rjuna
saṅgaṁ tyaktvā phalaṁ caiva
sa tyāgaḥ sāttviko mataḥ

कार्यम्-आवश्यक असे कार्य, इति-या प्रकारे; एव-नि:संदेह; यत्-जे, कर्म-कर्म, नियतम्-नेमलेले; क्रियते-केले जाते; अर्जुन-हे अर्जुन; सङ्गम्-संगत; त्यक्त्वा-सोडून; फलम्-फळ; -आणि; एव-खचित; स:-तो; त्यागः-त्याग; सात्विकः-सात्विक; मत:-माझ्या मते.

हे अर्जुन! ज्या वेळी मनुष्य नियत कर्म करायलाच हवे म्हणून करतो आणि सर्व प्रकारची भौतिक संगत आणि फलाची आसक्ती सोडून देतो त्या वेळी त्याचा त्याग सात्विक समजला जातो.

तात्पर्य: नियत कार्यकर्तव्याच्या भावनेने केले पाहिजे. मनुष्याला फलासक्ती सोडून कर्म केले पाहिजे, त्याने कर्माच्या गुणांपासून अलग झाले पाहिजे. कारखान्यात कुष्णभावनेने कर्म करणारा मनुष्य स्वत:ला कारखान्यातील कार्यात गुंतवून ठेवीत नाही अथवा कारखान्यातील कामगारांचा संग करीत नाही. तो केवळ श्रीकृष्णांकरिता कर्म करीत असतो आणि ज्या वेळी तो कर्मफळ श्रीकृष्णांना अर्पण करतो त्या वेळी तो दिव्य स्तरावर कार्य करीत असतो.

« Previous Next »