TEXT 34
akīrtiṁ cāpi bhūtāni
kathayiṣyanti te ’vyayām
sambhāvitasya cākīrtir
maraṇād atiricyate
अकीर्तिम् - अपकीर्ती; च- सुद्धा ; अपि-याशिवाय आणखी; भूतानि-सर्व लोक; कथायिष्यन्ति- वर्णन करतील; ते- तुझी; अव्ययाम् - नेहमी; सम्भावितस्य- सन्मान्य व्यक्तीसाठी; च-सुद्धा; अकीर्ति:- दुष्कीर्ती; मरणात् - मृत्यूपेक्षा; अतिरिच्यते- अधिक होते.
लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील आणि सन्मान्य व्यक्तीसाठी दुषकीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे.
तात्पर्य : अर्जुनाचा सखा आणि तत्त्वोपदेशक या नात्याने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या युद्ध करण्याच्या नकाराबद्दल अंतिम निर्णय देत आहेत. भगवान म्हणतात,‘‘अर्जुना, युद्धारंभ होण्यापूर्वीच तू जर युद्धभूमी सोडून गेलास तर लोक तुला भ्याड म्हणतील आणि जर तू म्हणत असशील की, लोक काहीही अपशब्द बोलले तरी तू युद्धभूमीतून पलायन करून तुझे प्राण वाचवशील, तर माझा तुला सल्ला आहे की, तू युद्धात मरणेच अधिक उत्तम आहे. तुझ्यासारख्या सन्माननीय व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. म्हणून प्राणरक्षणासाठी पलायन करण्यापेक्षा तू युद्धात मरण पावणे अधिक उत्तम आहे. यामुळे माझ्या मैत्रीचा दुरुपयोग करण्यापासून आणि आपली सामाजिक प्रतिष्ठा गमावण्यापासून तुझे रक्षण होईल.’’
म्हणून अर्जुनासाठी भगवंतांचा अंतिम निर्णय होता की, युद्धामध्ये माघार घेण्यापेक्षा त्याने युद्धात मृत्यू पत्करावा.