No edit permissions for मराठी

TEXT 35

bhayād raṇād uparataṁ
maṁsyante tvāṁ mahā-rathāḥ
yeṣāṁ ca tvaṁ bahu-mato
bhūtvā yāsyasi lāghavam

भयात् - भीतीमुळे; रणात् - रणांगणातून; उपरतम् - विमुख झालेला; मंस्यन्ते - ते समजतील; त्वाम- तू; महा-रथा:- मोठमोठे महारथी, सेनापती; येषाम् - ज्यांच्यासाठी; -सुद्धा; त्वम्- तु; बहु-मत- महान, सन्माननीय; भूत्वा- होऊन राहिलास; यास्यसि- प्राप्त होशील; लाघवम् - तुच्छतेचा किंवा कमीपणाचा.

ज्या मोठमोठ्या महारथी, सेनापतींनी तुझ्या नावलौकिकाची आणि यशाची वाखाणणी केली आहे, त्यांना वाटेल की, केवळ भीतीमुळे तू रणांगण सोडले आहेस आणि याप्रमाणे ते तुला तुच्छच समजतील.

तात्पर्य : भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपला निर्णय देणे चालूच ठेवले. ते पुढे म्हणतात की, तू असे समजू नकोस की, दुर्योधन, कर्ण आणि इतर योद्धांना तू आपले बंधू आणि पितामह यांच्याबद्दलच्या करुणेमुळे रणभूमी सोडून गेलास असे वाटेल. त्यांना वाटेल की, भयभीत होऊनच तू रणभूमी सोडून गेलास. तशा तर्‍हेने तुझया व्यक्तिमत्वाबद्दलचा त्यांना असणारा आदर साफ धुळीत मिसळून जाईल.

« Previous Next »