No edit permissions for मराठी

TEXT 49

dūreṇa hy avaraṁ karma
buddhi-yogād dhanañ-jaya
buddhau śaranam anviccha
kṛpaṇāḥ phala-hetavaḥ

दूरेण - ते दूरच ठेव; हि-खचित; अवरम्-निकृष्ट, निंद्य; कर्म-कर्म; बुद्धि-योगात्-कृष्णभावनेच्या बळावर; धनञ्जय- हे धनंजय, धनावर विजय प्राप्त करणाऱ्या; बुद्धौ - या भावनेमध्ये; शरणम्-पूर्णपणे शरणागत; अन्विच्छ-प्रयत्न कर; कृपणा:- लोभी, कृपण; फल-हेतव:- सकाम कर्माची इच्छा करणारे किंवा फळाच्या हेतूने पूर्ण करणारे.

हे धनंजया! भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद्य अशा कर्मांना दूर सार आणि त्या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा. जे आपल्या कर्मफलांचा उपभोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहेत.

तात्पर्य : आपण भगवंतांचे नित्य सेवक आहोत व आपल्या मूळ स्वरूपाला ज्याने वस्तुत: जाणले आहे तो कृष्णभावनाभावित कर्माव्यतिरिक्त इतर सर्व कर्मांचा त्याग करतो. पूर्वीच वर्णन केल्याप्रमाणे बुद्धियोग म्हणजे भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा होय. अशी भक्तिपूर्ण पे्रेममयी सेवा म्हणजे आत्म्याचा कर्म करण्याचा योग्य मार्ग आहे. केवळ कृपण लोकच आपल्या कर्मफलाचा उपभोग घेण्याची इच्छा करतात, पण त्यामुळे ते भवबंधनात अधिकच गुंतत जातात. कृष्णभावनेमध्ये केलेल्या कर्माव्यतिरिक्त इतर सर्व कर्मे ही निंद्य अशी कर्मेच आहेत. कारण अशा कर्मांमुळे मनुष्य पुन:पुन्हा जन्ममृत्यूच्याच चक्राला बांधला जातो. म्हणून एखाद्याने स्वत: कर्माचे कारण बनण्याची कधीच इच्छा करू नये. सर्व काही कृष्णभावनेमध्ये म्हणजेच श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी केले पाहिजे. कृपण व्यक्तीला सुदैवाने किंवा कठीण परिश्रमाने प्राप्त केलेल्या संपत्तीचा योग्य उपयोग करसा करावा याचे ज्ञान नसते. मनुष्याने आपली संपूर्ण शक्ती कृष्णभावनाभावित कर्म करण्यात खर्ची घातली पाहिजे आणि त्यामुळेच त्याला आपले जीवन यशस्वी करता येईल. कृपण व्यक्तीप्रमाणेच दुर्दैवी लोकही आपल्या मनाची शक्तीचा भगवत्सेवेमध्ये उपयोग करीत नाहीत.

« Previous Next »