TEXT 50
buddhi-yukto jahātīha
ubhe sukṛta-duṣkṛte
tasmād yogāya yujyasva
yogaḥ karmasu kauśalam
बुद्धि-युक्त:-जो भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न झाला आहे; जहाति-मुक्त होऊ शकतो; इह-या जन्मामध्येच; उभे-दोन्ही; सुकृत-दुष्कृते- चांगले आणि वाईट फह; तस्मात्- म्हणून; योगाय-भक्तिपूर्ण सेवेकरिता; युज्यस्व-अशा रीतीने संलग्नहो; योग:-कृष्णभावना; कर्मसु-सर्व कर्मांमध्ये; कौशलम्- कौशल्य, कला.
भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न झालेला मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्य आणि वाईट कर्मांपासून मुक्त होतो म्हणून योगयुक्त होण्याचा प्रयत्न कर, कारण योग हेच सर्व कर्मातील कौशल्य आहे.
तात्पर्य: अतिप्राचीन काळापासून प्रत्येक जीवात्म्याने आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माच्या विविध फलांचा संचय केला आहे. म्हणूनच तो आपल्या मूळ वैधानिक स्वरुपस्थितीपासून सतत अनभिज्ञ राहिला आहे. मनुष्याच अज्ञान भगवद्गीतेतील उपदेशांद्वारे दूर होऊ शकते. भगवद्गीता मनुष्याला सर्व परिस्थितीत भगवान श्रीकृष्णांना शरण जाण्यास आणि जन्मजन्मांतरापासून संचित झालेल्या क्रिया आणि प्रतिक्रियांच्या चक्रात बळी पडण्यापासून वाचविण्यास शिकविते. म्हणून अर्जुनाला कृष्णभावनेमध्ये कर्म करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण कृष्णभावना ही शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया आहे.