No edit permissions for मराठी

TEXT 36

api ced asi pāpebhyaḥ
sarvebhyaḥ pāpa-kṛt-tamaḥ
sarvaṁ jñāna-plavenaiva
vṛjinaṁ santariṣyasi

अपि-सुद्धा; चेत-जरी; असि-तू असलास; पापेभ्य:- पापी लोकांपेक्षा; सर्वेभ्य:- सर्वापेक्षा, पाप-कृत-तम्-सर्वाधिक पापी; सर्वम्-अशी सर्व पापकर्मे; ज्ञान-प्लवेन-दिव्य ज्ञानरुपी नौकेद्वारे; एव-निश्‍चितच; वृजिनम्-दु:खाच्या महासागरातून; सन्तरिष्यसि-तू पूर्णपणे तरून जाशील.

तुला सर्व पापी लोकांमध्ये अत्यधिक पापी जरी समजण्यात आले तरी तू जेव्हा दिव्य ज्ञानरुपी नौकेमध्ये आरूढ होशील तेव्हा तू दु:खरुपी महासागर पार करण्यास समर्थ होशील.

तात्पर्य: स्वत:च्या स्वरूपस्थितीचा श्रीकृष्णांशी असणारा संबंध योग्य रीतीने जाणणे ही इतकी सुंदर गोष्ट आहे की, यामुळे अज्ञानरुपी महासागरात चालणाऱ्या जीवनार्थ संघर्षातून मनुष्याचा तात्काळ उद्धार होऊ शकतो. या भौतिक जगाची तुलना कधी कधी अविद्यारूपी महासागराशी आणि कधी कधी वणव्याने पेट घेतलेल्या अरण्याशी करण्यात येते. एखादा मनुष्य कितीही कुशल पोहणारा असला तरी महासागरामध्ये अस्तित्वासाठी करावा लागणारा संघर्ष अत्यंत खडतर असतो. जर कोणी पुढे येऊन धडपड करणाऱ्या पोहणाऱ्या मनुष्याला महासागरातून वर काढीत असेल तर तो अत्यंत महान उद्धारक आहे. भगवंतांकडून प्राप्त केलेले परिपूर्ण ज्ञान म्हणजेच मुक्तिपथ आहे. कृष्णभावनारुपी नौका अत्यंत सुगम आहे आणि त्याचबरोबर ती उदात्तही आहे.

« Previous Next »