No edit permissions for मराठी

TEXT 36

asaṁyatātmanā yogo
duṣprāpa iti me matiḥ
vaśyātmanā tu yatatā
śakyo ’vāptum upāyataḥ

असंयत-उच्छूखल; आत्मना-मनाने; योग:-आत्मसाक्षात्कार, दुष्प्रापः-प्राप्त करण्यास कठीण; इति-याप्रमाणे; मे-माझे; मतिः-मत; वश्य-संयमित केलेल्या; आत्मना-मनाद्वारे; तुपरंतुः यतता-प्रयत्न करतानाः शक्यः-शक्य; अवाप्तुम्—प्राप्त करणे; उपायतः—योग्य साधनांनी.

ज्याचे मन उच्छुखल आहे त्याला आत्मसाक्षात्कार होणे कठीण आहे; परंतु ज्याचे मन संयमित आहे आणि जो योग्य साधनांद्वारे प्रयत्न करतो त्याला निश्चितच यशाची शाश्वती आहे, असे माझे मत आहे.

तात्पर्य: भगवंत सांगतात की, मनाला भौतिक कार्यांपासून अनासक्त करण्यासाठी जो मनुष्य योग्य उपचारांचा स्वीकार करीत नाही तो कदाचितच आत्मसाक्षात्कारामध्ये यशप्राप्ती करू शकतो. योगाभ्यासाचा प्रयत्न करताना, मनाला भौतिक सुखोपभोगामध्ये रत करणे म्हणजे वरून पाणी ओतताना अग्नी पेटविण्याचा प्रयत्न केल्याप्रमाणे आहे. मानसिक संयमनाशिवाय योगाभ्यास करणे म्हणजे केवळ कालापव्यय होय. योगाचा असा हा देखावा भौतिकदृष्ट्या लाभदायक असू शकेल, परंतु आध्यात्मिक साक्षात्काराच्या दृष्टीने पाहिल्यास असा योगाभ्यास व्यर्थ आहे. म्हणून मनुष्याने आपले मन निरंतर भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न करून त्याला संयमित केले पाहिजे. जोपर्यंत मन कृष्णभावनेमध्ये युक्त होत नाही तोपर्यंत ते स्थिर आणि संयमित होऊ शकत नाही. कृष्णभावनाभावित मनुष्य हा सहजपणे, विशेष असे प्रयास न करताच योगाभ्यासाचे फळ प्राप्त करतो; परंतु योगाभ्यासक कृष्णभावनाभावित झाल्याशिवाय यशप्राप्ती करू शकत नाही.

« Previous Next »