No edit permissions for मराठी

TEXT 27

naite sṛtī pārtha jānan
yogī muhyati kaścana
tasmāt sarveṣu kāleṣu
yoga-yukto bhavārjuna

-कधीच नाही; एते-हे दोन; सृती-निरनिराळे मार्ग; पार्थ-हे पार्था;जानन्-जरी ते जाणत असले; योगी-भगवद्भक्त;मुह्यति—मोहग्रस्त होतो; कश्चन-कोणताही; तस्मात्—म्हणून; सर्वेषु कालेषु—सदैव; योग-युक्तः—कृष्णभावनेमध्ये युक्त असलेला; भव—हो; अर्जुन—हे अर्जुना.

हे अर्जुना! भक्त जरी हे दोन्ही मार्ग जाणत असले तरी ते कधीच मोहित होत नाहीत. म्हणून तू सदैव भक्तीमध्ये युक्त हो.

तात्पर्य: भौतिक जगातून प्रयाण करताना जीव ज्या दोन मार्गाचा अवलंब करू शकतो त्या मार्गानी अर्जुनाने विचलित न होण्याचा उपदेश या ठिकाणी श्रीकृष्ण अर्जुनाला देत आहेत. आपले प्रयाण योगायोगाने किंवा पूर्वयोजनेनुसार होईल याची चिंता भगवंतांने कधीच करू नये. भक्ताने कृष्णभावनेमध्ये दृढपणे स्थित होऊन'हरे कृष्ण'जप केला पाहिजे. त्याने जाणले पाहिजे की, या दोन मार्गापैकी कोणत्याही मार्गाचे चिंतन करणे हे त्रासदायक गोष्ट आहे. कृष्णभावनेमध्ये तलीन होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये सदैव युक्त राहणे होय. यामुळे भगवद्धामात जाण्याचा मनुष्याचा मार्ग हा सुलभ, निश्चित आणि सुखरूप होईल. या श्लोकामध्ये योग-युक्त हा शब्द विशेषकरून महत्वपूर्ण आहे. जो योगामध्ये दृढ आहे तो आपल्या कार्याद्वारे निरंतर कृष्णभावनेमध्ये युक्त असतो. श्रीरूप गोस्वामी सांगतात की, अनासक्तस्य विषयान् यथाहमुपयुञ्जतः—मनुष्याने भौतिक क्रियांपासून अनासक्त झाले पाहिजे आणि सर्व काही कृष्णभावनेमध्ये केले पाहिजे. या युक्त-वैराग्य नामक पद्धतीद्वारे, मनुष्याला सिद्धी प्राप्त होते. यास्तव भक्त अशा वर्णनांमुळे विचलित होत नाही. कारण त्याला माहीत असते की, त्याचा भगवद्धामातील प्रवेश हा भक्तीद्वारे निश्चित होतो.

« Previous Next »