No edit permissions for मराठी

TEXTS 16-18

anantavijayaṁ rājā
kuntī-putro yudhiṣṭhiraḥ
nakulaḥ sahadevaś ca
sughoṣa-maṇipuṣpakau

kāśyaś ca parameṣv-āsaḥ
śikhaṇḍī ca mahā-rathaḥ
dhṛṣṭadyumno virāṭaś ca
sātyakiś cāparājitaḥ

drupado draupadeyāś ca
sarvaśaḥ pṛthivī-pate
saubhadraś ca mahā-bāhuḥ
śaṅkhān dadhmuḥ pṛthak pṛthak

अनन्त-विजयम् -अनन्तविजय नामक शंख; राजा-राजा; कुन्ती-पुत्र:-कौतेय; युधिष्ठिर:-युधिष्ठिर; नकुल:-नकुल; सहदेव:-सहदेव; -आणि; सुघोष-मणिपुष्पकौ-सुघोष आणि मणिपुष्पक नामक शंख; काश्य:- काशीचा राजा; -आणि; परम-इषु-आस:-श्रेष्ठ धनुर्धारी; शिखण्डी-शिखंडी; च-सुद्धा; महा-रथ:-सहस्र सैनिकांशी एकटाच लढू शकणारा; धृष्टद्युम्न:-धृष्टद्युम्न (राजा द्रुपदाचा पुत्र); विराट:- विराट (या राजाने पांडवांना अज्ञातवासच्या वेळी आश्रय दिला होता); च-सुद्धा; सात्यकि:- सात्यकी (म्हणजेच भगवान श्रीकृष्णांचा सारथी युयुधान); -आणि; अपराजित:-ज्याच्यावर कोणीच विजय प्राप्त करू शकला नाही; द्रुपद:- पांचालदेशाचा राजा, द्रुपद; द्रौपदेया:-द्रौपदीचे पुत्र; -सुद्धा; सर्वश:- सर्वजण; पृथिवी-पते- हे राजन्; सौभद्र:- सुभद्रापुत्र अभिमन्यू; -सुद्धा; महा-बाहु:-विशाल भुजा असलेला; शङ्खान्-शंख; दध्मु:- वाजविले; पृथक् पृथक-वेगवेगळे

कुंतीपूत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंतविजय नावाचा शंख वाजविला. त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नामक शंख वाजविले. हे राजन्! महाधनुर्धर काशीनरेश, श्रेष्ठ योद्धा शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट, अपराजित सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाबाहू पुत्र व इतरांनी आपापले शंख वाजविले.

तात्पर्य: संजयाने मोठ्या चातुर्याने धृतराष्ट्राला सांगितले की, पांडुपुत्रांना फसविणे आणि आपल्या स्वत:च्या पुत्रांना राज्याच्या सिंहासनावर बसविण्याचा प्रयत्न करण्याचे धोरण चुकीचे आहे व ते मुळीच स्तुत्य नाही. पूर्वलक्षणांवरून तर संपूर्ण कुरुवंश या महायुद्धामध्ये मारला जाईल, हे स्पष्टपणे कळून आले आहे. पितामह भीष्मांपासून ते अभिमन्यूसारख्या नातवंडापर्यंत, तसेच जगातील इतर सर्व राज्यांचे राजे, जे कोणी त्या ठिकाणी उपस्थित होते, त्या सर्वांचा विनाश निश्चित होता. राजा धृतराष्ट्रामुळेच ही आपत्ती कोसळली होती. कारण त्याने आपल्या मुलांनी स्वीकारलेल्या धोरणाला उत्तेजन दिले होते.

« Previous Next »