No edit permissions for मराठी

TEXT 23

rudrāṇāṁ śaṅkaraś cāsmi
vitteśo yakṣa-rakṣasām
vasūnāṁ pāvakaś cāsmi
meruḥ śikhariṇām aham

रुद्राणाम्-रुद्रांमध्ये; शडूरः-भगवान शंकर; -सुद्धा; अस्मि-मी आहे; वित्त-ईश:- देवतांचा कोषाध्यक्ष; यक्ष-रक्षसाम्-यक्ष आणि राक्षसांमध्ये; वसूनाम्-वसूमध्ये; पावकःअग्नी; -सुद्धा; अस्मि-मी आहे; मेरु:-मेरू; शिखरिणाम्—सर्व पर्वतांमध्ये; अहम्-मी आहे.

 सर्व रुद्रांमध्ये शंकर मी आहे, यक्ष आणि राक्षसांमध्ये कुबेर मी आहे, वसूमध्ये अग्नी मी आहे, आणि सर्व पर्वतांमध्ये मेरू मी आहे.

तात्पर्य: एकूण अकरा रुद्र आहेत आणि त्यांच्यापैकी भगवान शंकर हे प्रमुख आहेत. ब्रह्मांडामध्ये तमोगुणाचे अधिष्ठाता असणारे शंकर हे भगवदातार आहेत. यक्ष आणि राक्षसांचा अधिपती व देवदेवतांचा कोषाध्यक्ष हा कुबेर आहे आणि तो भगवंतांचा प्रतिनिधी आहे. मेरू पर्वत हा त्यातील प्राकृतिक साधनसंपत्तीबद्दल विश्वविख्यात आहे.

« Previous Next »