No edit permissions for मराठी

TEXT 24

purodhasāṁ ca mukhyaṁ māṁ
viddhi pārtha bṛhaspatim
senānīnām ahaṁ skandaḥ
sarasām asmi sāgaraḥ

पुरोधसाम्—सर्व पुरोहितामध्ये; —सुद्धा; मुख्यम्-प्रमुखः माम्—मी; विद्धि—जाण; पार्थ—हे पार्था; बृहस्पतिम्—बृहस्पती, सेनानीनाम्-सर्व सेनानीमध्ये; अहम्—मी; स्कन्दः—कार्तिकेय; सरसाम्-सर्व जलाशयांमध्ये; अस्मि-मी आहे; सागर:-सागर.

हे अर्जुना! पुरोहितांमधील प्रमुख पुरोहित, बृहस्पती मीच असल्याचे जाण. सेनापतींमध्ये कार्तिकेय मी आहे आणि जलाशयांमध्ये सागर मी आहे.

तात्पर्यः स्वर्गलोकातील देवांमध्ये इंद्र प्रमुख आहे आणि म्हणून त्याला स्वर्गाधिपती म्हटले जाते. इंद्र ज्या ग्रहलोकावर राज्य करतो त्या ग्रहलोकाला इंद्रलोक असे म्हणतात. बृहस्पती हा इंद्राचा पुरोहित आहे आणि इंद्र हा राजाधिराज असल्यामुळे बृहस्पतीही प्रमुख पुरोहित आहे. ज्याप्रमाणे इंद्र राजाधिराज आहे त्याप्रमाणे शंकर व पार्वती यांचा पुत्र, स्कंद किंवा कार्तिकेय हा सर्व सेनापतींचा प्रमुख आहे. सर्व जलाशयांमध्ये समुद्र हा सर्वश्रेष्ठ आहे. श्रीकृष्णांच्या या सर्व विभूती त्यांची महानता सूचवितात.

« Previous Next »