No edit permissions for मराठी

TEXT 31

pavanaḥ pavatām asmi
rāmaḥ śastra-bhṛtām aham
jhaṣāṇāṁ makaraś cāsmi
srotasām asmi jāhnavī

पवन:-वायू; पवताम्-पवित्र करणा-यांमध्ये; अस्मि-मी आहे; राम:-राम; शस्त्र-भूता- शस्त्र धारण करणा-यांमध्ये; अहम्-मी आहे; झषाणाम्-सर्व मत्स्यांमध्ये; मकरः-मकरमासा (शार्क); -सुद्धा; अस्मि-मी आहे; स्त्रोतसाम्-प्रवाही नद्यांमध्ये; अस्मि-मी आहे; जाह्नवी-गंगा नदी, जाह्नवी.

पवित्र करणा-यांमध्ये वायूमी आहे, शस्त्र धारण करणा-यांमध्ये राम मी आहे, मत्स्यांमध्ये मकरमासा मी आहे आणि प्रवाही नद्यांमध्ये गंगा नदी मी आहे.

तात्पर्यः सर्व जलचरांमध्ये शार्क हा सर्वांत मोठा आणि निश्चितच मनुष्यांसाठी घातक आहे, म्हणून शार्क मासा म्हणजे श्रीकृष्णांचीच विभूती आहे.

« Previous Next »