TEXT 33
akṣarāṇām a-kāro ’smi
dvandvaḥ sāmāsikasya ca
aham evākṣayaḥ kālo
dhātāhaṁ viśvato-mukhaḥ
अक्षराणाम्-अक्षरांमध्ये; अ-कारः-प्रथम अक्षर 'अ'; अस्मि-मी आहे; द्वन्द्वः-द्वंद्वः सामासिकस्य-समासांमध्ये;च-आणि; अहम्-मी आहे; एव-निश्चितपणे; अक्षयः-अक्षय किंवा शाश्वत; काल:-काळ; धाता-सृष्टिकर्ता; अहम्-मी आहे; विश्वतः-मुखः-ब्रह्मदेव.
अक्षरांमध्ये 'अ'कार मी आहे आणि समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे. अविनाशी काळ मी आहे आणि सृष्टिकर्त्यांमध्ये ब्रह्मदेव मी आहे.
तात्पर्य: संस्कृत वर्णमालेतील 'अ'कार या प्रथम स्वरापासून वेदांचा प्रारंभ होतो. 'अ' काराविना कोणताच ध्वनी काढता येत नाही. म्हणून 'अ' हा ध्वनीचा प्रारंभ आहे. संस्कृत भाषेमध्ये अनेक सामासिक शब्द आहेत, उदाहरणार्थ रामकृष्ण, या समासाला द्वंद्व समास म्हणतात. या समासामध्ये राम आणि कृष्ण हे दोन्ही शब्द प्रधान आहेत म्हणून त्याला द्वंद्व समास म्हटले जाते.
क्षय करणा-यांमध्ये काळ सर्वश्रेष्ठ आहे, कारण काळ सर्वांचाच -हास करतो. काळ हा श्रीकृष्णांचेच रूप आहे, कारण कालांतराने प्रलयाग्नीत सर्वच गोष्टींचा संहार होणार आहे.
सृजनकत्यां जीवांमध्ये चतुर्मुखी ब्रह्मदेव प्रधान आहे. म्हणून तो भगवान श्रीकृष्णांचा प्रतिनिधी आहे.